रविंद्र जडेजा(फोटो-सोशल मिडिया)
IPL २०२५ : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजाने आयपीएल २०२५ मध्ये मोठा इतिहास रचला आहे. रवींद्र जडेजा आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक विकेट चटकाणारा गोलंदाज बनला आहे. त्याने ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडीत काढत ही कामगिरी केली आहे. आयपीएल २०२५ च्या ५७ व्या सामन्यात, रवींद्र जडेजाने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध १ विकेट घेतली होती. यासह, त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी १४१ विकेट्स मिळवली. जडेजाने १८४ सामन्यांमध्ये १४१ बळी मिळवले आहे. तर ब्राव्होने १४० विकेट्स घेतल्या आहेत. ब्राव्होने ११६ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. पण आता रवींद्र जडेजाने विकेट्सच्या बाबतीत मात्र पुढचा नबर पटकवला आहे.
हेही वाचा : PBKS vs DC : सुरक्षेच्या कारणामुळे सामना रद्द! सविस्तर वाचा झालेल्या सामन्याची अहवाल
या यादीत रविचंद्रन अश्विन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी १०५ सामन्यांमध्ये ९५ विकेट्स घेण्यात यश मिळवलं आहे. त्यानंतर अल्बी मॉर्केल ७६ विकेट्ससह चौथ्या स्थानावर विराजमान आहे. दीपक चहर ७६ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत शार्दुल ठाकूरचा देखील समावेश आहे. त्याने चेन्नईसाठी ५७ सामन्यात ६० विकेट्स मिळवल्या आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये जडेजाची कामगिरी
आयपीएलच्या २०२५ च्या १८ व्या हंगामात, रविंद्र जडेजाने या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून सर्व १२ सामने खेळून काढले आहेत. आहेत फलंदाजीने २७९ धावा केल्या आहेत आणि आठ फलंदाजांना बाद मंगहरी देखील पाठवले आहे. तो आयपीएल २०२५ मध्ये सीएसकेसाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा आणि चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
हेही वाचा : PBKS vs DC : ब्लॅकआउट दरम्यान आयपीएल अध्यक्ष उतरले मैदानावर, प्रेक्षकांना स्टेडियम सोडण्याचे केले आवाहन
इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये ५७ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात बुधवारी (७ मे) खेळला गेला. सामन्यापूर्वी केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर केकेआरने १८० धावा उभारल्या. चेन्नईच्या संघाने दोन चेंडू शिल्लक ठेवत ही धावसंख्या गाठली. या पराभवामुळे कोलकाताचा आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफचा मार्गही कठीण होऊन बसलाया आहे. चेन्नईच्या या विजयाचा हीरो डेवाल्ड ब्रेव्हिस ठरला आहे. त्याने जलद गतीने अर्धशतक साकारत चेन्नईला लक्षपर्यंत पोहचवले आणि अखेर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या स्टाइलने १७ धावांची नाबाद खेळी करत संघाचा विजय निश्चित केला.