फोटो सौजन्य - rvmoorthy
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तन यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले आहे. भारताच्या आर्मीने सिंदूर ऑपरेशन केल्यानंतर आज पाकिस्तानने ड्रोन हल्ला भारतावर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे युद्धाला सुरुवात झाली आहे. हे तणावाचे वातावरण आणखीनच वाढत चालले आहे. आज आयपीएल २०२५ चा ५८ वा सामना सुरु होता हा सामना रद्द करण्यात आला आहे. आयपीएल २०२५ मध्ये ८ मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना खेळवण्यात येत होता. पण पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारामुळे धर्मशाळेत ब्लॅकआउट लागू करण्यात आला. यानंतर सामना थांबवण्यात आला. आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सुरु असलेला सामना लगेचच थांबवण्यात आला आणि त्यानंतर आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये अरुण धुमल स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना बाहेर जाण्याचे आवाहन करताना दिसले. धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना खेळला जात होता. पण अचानक पाकिस्तानकडून देशातील अनेक शहरांमध्ये गोळीबार सुरू झाला. त्यामुळे पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना रद्द करण्याची वेळ आली आहे.
IPL Governing Council chairman Arun Dhumal is seen requesting people to leave the stadium after the Punjab Kings vs Delhi Capitals match was called off in Dharamsala.
📹: @rvmoorthyhindu #IPL2025 | #PBKSvsDC pic.twitter.com/BH9jmZaYHC
— Sportstar (@sportstarweb) May 8, 2025
सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल हे मैदानावर दिसत आहेत आणि ते स्टेडियममध्ये आलेले ऑडियन्सला जाण्याची विनंती करताना दिसत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल. बीसीसीआयने खेळाडूंना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणाले की, आम्ही सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करत आहोत.
सध्या सर्व सामने रद्द करण्यात आले आहेत आणि स्टेडियम रिकामे करण्यात आले आहे. परिस्थितीनुसार स्पर्धा पुढे जायची की नाही हे आम्ही उद्या ठरवू. सध्या आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळाडू सुरक्षित राहणे. भारतीय नियामक मंडळ इंडियन प्रीमियर लीगचे उर्वरित सामन्यांसंदर्भात उद्यापर्यत सविस्तर माहिती दिली जणार आहे त्यासंदर्भात उद्या निर्णय घेतले जाणार आहेत अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.