संजय मांजरेकर(फोटो-सोशल मीडिया)
Birthday Special : भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर आज १२ जुलै रोजी त्यांचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहेत. मांजरेकर यांचा जन्म १२ जुलै १९६५ रोजी झाला असून क्रिकेटनंतर त्यांनी समालोचनात आपले नशीब आजमावले आणि नंतर त्यातच पुढे करिअर केले. मांजरेकर हे असे खेळाडू आहेत कि जे आपल्या क्रिकेटपेक्षा जास्त वादाच्या मैदानात जास्त दिसून आले.
संजय मांजरेकर यांची एकेकाळी भारतीय संघाचे विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळख होती. आता तो त्याच्या विधानांमुळे आणि भाष्यांमुळे अनेकदा चर्चेत येत असतो. १२ जुलै १९६५ रोजी कर्नाटकातील मंगळुरू येथे संजय मांजरेकरचा जन्म झाला आहे. त्यांनी मुंबईकडून आपले स्थानिक क्रिकेट खेळले आहे. मांजरेकर यांनी १९८७ ते १९९६ पर्यंत भारताकडून एकूण ३७ कसोटी आणि ७४ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये २०४३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी चार शतकं लगावली आहेत. त्यांच्या नावावर एकदिवसीय सामन्यात १९९४ धावा जमा आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा : इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत शुभमन गिलने विराट कोहलीला टाकलं मागे!
मांजरेकर हे त्यांच्या काळातील सर्वात विश्वासार्ह फलंदाज राहिले आहेत. यानंतर देखील त्यांची कारकीर्द फार काळ टिकू शकली नाही. यानंतर त्यांनी समालोचनाकडे आपला मोर्चा वळवला आणि तिथून पुढे ते नेहमी वादात सापडत गेले. संजय मांजरेकर हे त्यांच्या स्पष्ट आणि स्पष्ट मतांसाठी ओळखले जातात. परंतु, कधीकधी त्यांच्या विधानांमुळे क्रिकेट चाहते आणि खेळाडू देखील दुखावले गेले आहेत.
२०१९ च्या विश्वचषकादरम्यान, मांजरेकर यांनी रवींद्र जडेजाला ‘छोटे-छोटे’ खेळाडू असे म्हटले होते, ज्याला तेव्हा अनेकांकडून तीव्र विरोध झाला होता. जडेजाने स्वतः सोशल मीडियावर मांजरेकर यांच्यावर टीका केली होती. हा वाद इतका टोकाला गेला कि, पुढच्या वर्षी बीसीसीआयने मांजरेकर यांना समालोचक पॅनेलमधून काढून टाकले होते. तथापि, नंतर त्यांनी माफी मागितली आणि त्यांना पुन्हा समालोचक संघात समाविष्ट करण्यात आले होते .
मांजरेकर यांनी वेळोवेळी विराट कोहली, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन आणि गौतम गंभीर सारख्या खेळाडूंबद्दल देखील वादग्रस्त टिप्पण्या केल्या आहेत. त्यांनी एकदा सहकारी समालोचक हर्षा भोगले यांच्या क्रिकेट ज्ञानावर सुदधा प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.
मांजरेकर यांनी टी-२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात विराट कोहलीला स्थान देण्यात आले नव्हते. त्यावर त्यांनी म्हटले होत कि, कोहलीचा फॉर्म तितका प्रभावी नाही. पण त्याच स्पर्धेत कोहलीच्या शानदार फलंदाजीमुळे भारत विजेता झाला आणि मांजरेकरांच्या मतावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते.
हेही वाचा : T20 विश्वचषक 2026 साठी 15 संघ तयार! 5 जागा शिल्लक कोणाचा लागणार नंबर?