भारताचा संघ सध्या इंग्लड दौऱ्यावर आहे, या दोन्ही संघामध्ये पाच सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेचा सध्या तिसरा सामना सुरु आहे, आज या सामन्याचा तिसरा दिवस खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या निवृतीनंतर शुभमन गिल याने संघाचे नेतृत्व केले. यामध्ये त्याने त्याच्या कॅप्टन्सीमध्येच नाही तर फलंदाजीने देखील चाहत्यांची मने जिंकली आहेत. शुभमन गिलने भारतीय कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे, त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. कोहलीने २०१८ मध्ये मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकून हा विक्रम केला होता.
भारतीय संघासाठी एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करणारे कर्णधार. फोटो सौजन्य - X
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात शुभमन गिलच्या बॅटने चांगली कामगिरी केली नसली तरी, त्याने १६ धावा करून विराट कोहलीचा विक्रम मोडला. आता शुभमन गिलच्या नावावर इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा (६०१) करण्याचा विक्रम आहे. गिलकडे अजूनही ५ डाव शिल्लक आहेत, त्यामुळे तो त्यात आणखी धावा जोडू शकतो. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
इंग्लंड दौऱ्यावर कर्णधार म्हणून पदार्पण करणारा शुभमन गिल एकामागून एक अनेक विक्रम मोडत आहे. त्याने अलीकडेच विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. २०१८ मध्ये कोहलीने भारतीय कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता, आता तो विक्रम मोडून शुभमन गिल नंबर-१ झाला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
२०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहलीने ५ सामन्यात ५९३ धावा केल्या, त्यादरम्यान त्याचा सर्वोच्च धावसंख्या १४९ धावा होती. त्याने ही खेळी एजबॅस्टन येथे खेळली. इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा कोहलीचा विक्रम आता शुभमन गिलने मोडला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी १९९० मध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि ३ सामन्यांच्या मालिकेत ४२६ धावा केल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
या यादीत माजी कर्णधार सौरव गांगुली चौथ्या स्थानावर आहे. २००२ च्या इंग्लंड दौऱ्यावर गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि ४ सामन्यांमध्ये ३५१ धावा केल्या. त्या काळात त्याची सर्वोच्च धावसंख्या १२८ होती. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
धोनीने भारतीय कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये ३४९ धावा करण्याचा विक्रम केला आहे, तो या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात धोनीने या ३४९ धावा केल्या होत्या. फोटो सौजन्य - सोशल मिडीया