फोटो सौजन्य – X
भारत आणि श्रीलंका येथे आयोजित करण्यात आलेल्या 2026 मधील t20 विश्वचषकासाठी सगळेच क्रिकेट चाहते फारच उत्सुक आहेत. भारतामध्ये क्रिकेटला एका उत्सवासारखे साजरे केले जाते. सध्या t20 विश्वचषक 2026 साठी क्वालिफायर सामने सुरू आहेत. आतापर्यंत या विश्वचषकामध्ये पंधरा संघ क्वालिफाय झाले आहेत. यामध्ये भारत, इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, अफगाणिस्तान, वेस्टइंडीज यांसारख्या देशांचा समावेश आहे.
इटली आणि नेदरलँड यांच्यामध्ये काल सामना पार पडला, या सामन्यांमध्ये नेदरलँडच्या संघाने विजय मिळवून t20 विश्वचषकामध्ये स्थान पक्के केले आहेत. त्याचबरोबर इडलीचा संघ देखील टी-ट्वेंटी विश्वचषक पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप युरोप क्वालिफायर या स्पर्धेमधून या दोन्ही संघांना टी-ट्वेंटी विश्वचषकाचे तिकीट मिळाले आहे.
आयसीसी टी-20 रँकिंगच्या माध्यमातून न्युझीलँड, आयर्लंड आणि पाकिस्तान या तीनही संघांना देखील टी-ट्वेंटी विश्वचषकाचे टिकीट हाती लागले आहे. 12 संघांना कोणतेही क्वालिफायरचे सामने न खेळता हे संघ टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये सामील होणार आहेत. पण उर्वरित आठ संघांना क्वालिफायरचे सामने खेळून त्यामध्ये विजय मिळवून त्यानंतर त्यांना t20 विश्वचषिका मध्ये सामील होता येणार आहे.
कॅनडा आणि अमेरिका हे दोन्ही संघ टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यानंतर इटली आणि नेदरलँड हे युरोप क्वालिफायर मध्ये जिंकून टॉप 20 संघांमध्ये सामील झाले आहेत. अजूनपर्यंत t20 विश्वचषकाचे पाच पाने रिकामी आहेत यामध्ये दोन संघ हे आफ्रिकेमधील असतील तर तीन संघ हे आशिया आणि ईएपी कॉलिफायरच्या माध्यमातून t20 विश्वचषकामध्ये क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करतील.
Netherlands and Italy qualify from Europe, leaving five spots up for grabs for ICC Men’s #T20WorldCup 2026 👀
➡️ https://t.co/rdTHHVs76D pic.twitter.com/8VAJW3hdP4
— ICC (@ICC) July 12, 2025
2024 मध्ये भारताच्या संघाने टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे आता भारताचा संघ हा आहे टायटल डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल तर या स्पर्धेचा उपविजेता संघ हा दक्षिण आफ्रिकेचा संघ होता. भारताच्या संघाने मागील काही वर्षांमध्ये आयसीसी ट्रॉफीसाठी चांगली कामगिरी केली आहे. T20 विश्वचषका नंतर टीम इंडियाने चॅम्पियन ट्रॉफी देखील जिंकली होती.
अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अमेरिका, वेस्ट इंडिज, इटली, नेदरलँड्स