काव्या मारन(फोटो-सोशल मीडिया)
SRH vs HCA : सध्या सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. आता पुन्हा एकदा ती आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख ए जगन मोहन राव यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. यामागील कारण म्हणजे एचसीए प्रमुखांना झालेली अटक. आयपीएल फ्रँचायझीकडून ‘फेवर’ मागितल्याबद्दल एचसीए प्रमुखांना चांगलीच किंमत मोजावी लागली आहे. तेलंगणा सीआयडीकडून हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांसह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
एआरएचची मालकीण काव्या मारनच्या तक्रारीनंतर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मारणने म्हटले होते की एचसीए सतत त्याला ब्लॅकमेल करत होता आणि शिवीगाळ देखील करत होता. सध्या, एचसीएच्या प्रमुखासह चार अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : IND vs ENG : बुमराह की आर्चर? लॉर्ड्सवर कोण वर्चस्व गाजवेल? जाणून घ्या हेड-टू-हेड
इंडियन प्रीमियर लीग २०२५ दरम्यान एसआरएचकडून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला एक पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात एसआरएचने आरोप केला होता की हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए) त्यांच्यावर वारंवार मोफत पास देण्यासाठी दबाव टाकत आहे. वृत्तानुसार, एससीएचे अधिकारी एसआरएचला धमकी देखील देत होते. जर त्यांनी त्यांना मोफत तिकिटे दिली नाहीत तर ते स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान गोंधळ निर्माण करतील. अशी धमकी दिली होती.
यानंतर, एसआरएच फ्रँचायझीने एक पत्र लिहिले ज्यामध्ये असे म्हटले होते की, जर हे ब्लॅकमेलिंग थांबवण्यात आले नाही तर ते घरचे सामने हैदराबादबाहेर हलवण्याचा विचार देखील करू शकतात. एसआरएचच्या या तक्रारीनंतरच राज्याचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
एसआरएचने केलेल्या तक्रारीनंतर, आतापर्यंत हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तेलंगणा पोलिसांच्या सीआयडी पथकाकडून ही अटक करण्यात आली आहे. यामध्ये एचसीएचे अध्यक्ष ए जगन मोहन राव, कोषाध्यक्ष सी श्रीनिवास राव, सीईओ सुनील कांते, सरचिटणीस राजेंद्र यादव आणि राजेंद्र यादव यांच्या पत्नी जी कविता यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा : इटलीने केला मोठा उलटफेर! स्कॉटलंडला हरवून पहिल्यांदाच मिळू शकते T20 विश्वचषकाचे तिकीट
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या या सर्व अधिकाऱ्यांची बराच काळ चौकशी केली गेली. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. या सर्वांवर सत्तेचा गैरवापर, आर्थिक अनियमितता आणि ब्लॅकमेलिंग असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. या घटनेनंतर एसआरएच त्यांचे घरचे सामने पुढे ढकलून दुसऱ्या राज्यासोबत सामने खेळण्याची शक्यता आहे. अशी चर्चा आता मूळ धरू पाहत आहे.