फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सूर्यकुमार यादव व्हिडीओ : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या T२० मालिका सुरु झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या मैदानावर ६१ धावांनी पराभूत केले. यामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनने संघासाठी शतक ठोकले. त्याचबरोबर टिळक वर्माने आणि कॅप्टन सूर्यकुमार यादवने देखील संघासाठी महत्वाची खेळी खेळली. आता सोशल मीडियावर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेन यांच्यात बाचाबाची झाली. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. मैदानावरील पंचांच्या हस्तक्षेपामुळे प्रकरण शांत झाले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – WI vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर! अनुभवी खेळाडू करणार संघामध्ये पुनरागमन
दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या १५व्या षटकात ही घटना घडली आहे. रवी बिश्नोईने 15 वे षटक टाकले. यादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने खेळपट्टीच्या उजव्या बाजूने थ्रो गोळा केला. याने रागाने पाहिले आणि संजू सॅमसनला काहीतरी म्हणाला. यानंतर सूर्यकुमार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. दोघांमध्ये काही काळ वाद सुरू होता. जॅन्सनच्या वागण्यावर नाराज असलेला सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडूशी बोलताना दिसला. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर मैदानावरील पंचांनी दोघांना वेगळे केले. त्याच्या जागी परत येताना सूर्या गेराल्ड कोएत्झीसोबत गप्पा मारतानाही दिसला. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिश्नोईने मार्को जॅनसेनला 12 च्या वैयक्तिक स्कोअरवर बाद केले.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) November 8, 2024
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने T20 मध्ये सलग 11 वा विजय नोंदवला. संजू सॅमसनच्या शानदार शतकानंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू वरूण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांच्या घातक गोलंदाजीसमोर पाणी मागतांना दिसले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 202 धावा केल्या. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 17.5 षटकांत 141 धावांतच गारद झाला. या शानदार शतकासाठी संजूला सामनावीराचा किताब देण्यात आला. आता या विजयानंतर भारताच्या संघाकडे मालिकेमध्ये १-० अशी आघाडी आहे. भारतीय गोलंदाजांनी देखील कालच्या सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावली. यामध्ये वरून चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतले तर आवेश खानने २ विकेट घेतले आणि अर्शदीप सिंहने संघासाठी एक विकेट नावावर केला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पुढील सामना १२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारताच्या संघाने मालिकेचा दुसऱ्या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यास पराभव होण्याचे संकट भारताच्या डोक्यावर नसेल. कारण भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चार सामान्यांची मालिका होणार आहे.