कार्लोस अल्काराझ(फोटो-सोशल मीडिया)
HSBC Championship 2025 : स्पेनच्या २२ वर्षीय कार्लोस अल्काराजने क्वीन्स क्लब चॅम्पियनशिप (एचएसबीसी) च्या जेतेपदावर नाव कोरले आहे. विम्बल्डनच्या फक्त ८ दिवस बाकी असताना अल्काराजने स्पॅनिश खेळाडूसाठी ही एक मोठी कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने चेक गणराज्याच्या जिरी लेहेचकाला ७-५, ६-७ आणि ६-२ असे पराभूत करून जेतेपद पटकावले. एक लक्षात घेण्यासारखे आहे की कार्लोस अल्काराजचे हे दुसरे क्वीन्स क्लब जेतेपद ठरले आहे.
अल्काराजसाठी हा विजय खूप महत्त्वाचा असणार आहे. त्याने हे जेतेपद जिंकल्यानंतर आपण खूप आनंदी असल्याचे म्हटले आहे. जेतेपद जिंकल्यानंतर अल्काराजने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “ही स्पर्धा माझ्यासाठी खूप विशेष आहे आणि पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकल्याबद्दल खूप आनंदी आहे.” असे त्याने म्हटले आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘पंतला क्रिकेट गणित चांगलेच..’, माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीकडून शतकवीर रिषभचे कौतुक..
अल्काराज पुढे म्हणाला की, “मी येथे कोणत्या देखील अपेक्षा न बाळगता आलो होतो. फक्त चांगले टेनिस खेळण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि चॅम्पियन होण्याचे भाग्य मला मिळाले. माझे बरेच मित्र आणि कुटुंब येथे उपस्थित होते, त्यामुळे मला कोर्टच्या आत आणि बाहेर खरोखरच आरामदायी वाटले.”
अल्काराजने ग्रास कोर्टबद्दल देखील माहिती दिली, तो म्हणाला, “फक्त दोन दिवसांच्या सरावानंतर मातीपासून गवतावर खेळायला येणे कठीण होते. येथे येण्याचे माझे ध्येय दोन-तीन सामने खेळून गवतावर आरामदायी होणे होते, परंतु मी लवकरच गवताशी जुळवून घेतले असून मला याचा खूप अभिमान आहे.”
हेही वाचा : पृथ्वी शॉ मुंबई क्रिकेट संघ सोडणार? दुसऱ्या राज्याकडून खेळण्याची योजना! MCA कडून मागितली माफी
अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या चेक जिरी लेहेचका देखील दोन सेटमध्ये चांगला खेळताना दिसला आहे. सामना गमावल्यानंतर लेहेचकाने आपली परतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “मला आता शब्द शोधणे थोडे कठीण जात आहे, पण आज जेतेपदासाठी खेळायला मिळाले की ज्याचा मला अजूनही खूप आनंद होत आहे. मी आज माझे सर्वस्व पणाला लावले होते, दुर्दैवाने ते पुरेसे ठरले नाही. कार्लोस आणि त्याच्या टीमचे त्यांच्या उत्तम कामाबद्दल अभिनंदन.”
भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जून पासून सुरवात झाली आहे. हेडिंग्ले, लीड्स येथे पहिला सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटी पहिल्या डावात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध एकूण ४७१ धावा उभारल्या. यादरम्यान सलामीवीर यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या तिघांनी दमदार शतकं ठोकली आहेत. प्रतिउत्तरात इंग्लंडने ऑली पोपचे शतक आणि हॅरी ब्रूकच्या ९९ धावांच्या जोरावर ४६५ धावा केल्या. भारताने ३ गडी गमावून १०१ धावा करून १०७ धावांची आघाडी घेतली आहे.