फोटो सौजन्य – X
पृथ्वी शॉ मुंबई क्रिकेट संघ सोडण्याच्या इराद्यात : भारताचा संघ सध्या इंग्लड दौऱ्यावर आहे, टीम इंडीया इंग्लडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेचा पहिला सामना सध्या सुरु आहे. यामध्ये भारताच्या युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. याचदरम्यान आता भारतीय क्रिकेट संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक विजेता कर्णधार पृथ्वी शॉ सध्या भारताच्या सर्वात प्रतिभावान तरुण खेळाडूंपैकी एक मानला जातो, परंतु तरीही त्याला भारतीय संघात संधी मिळत नाही.
त्याला मागील बरीच वर्ष भारतीय संघामधुन त्याचबरोबर आयपीएल 2025 मध्ये देखील स्थान मिळाले नाही. तो मुंबईच्या स्थानिक संघाबाहेर आहे. दरम्यान, बातम्यांनुसार, त्याने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आणखी २ ते ३ राज्य संघांसाठी खेळण्याची मोठी ऑफर मिळाली आहे. विक्री न झाल्यामुळे शॉ यावर्षी आयपीएलचा भाग नव्हता.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला या वृत्ताची पुष्टी केली आणि सांगितले की, ‘पृथ्वी शॉने आमच्याकडून एनओसी मागितली आहे आणि आम्ही लवकरच त्यावर निर्णय घेणार आहोत.’ खराब तंदुरुस्तीमुळे, पृथ्वी शॉ मुंबईच्या विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी संघाचा भाग नाही. संघ व्यवस्थापनाने त्याला त्याच्या तंदुरुस्तीवर काम करण्याचा सल्ला दिला होता. वृत्तानुसार, शॉला २ ते ३ वेगवेगळ्या राज्यांच्या संघांकडून खेळण्याच्या ऑफर मिळाल्या आहेत. खराब तंदुरुस्तीमुळे तो भारतीय संघाबाहेरही होता. अलिकडच्या काळात, तो त्याच्या तंदुरुस्तीवर काम करताना दिसला आहे.
🚨 SHAW WANTS TO LEAVE MUMBAI. 🚨
– Prithvi Shaw seeks NOC from Mumbai as he wants to play for another state team. (Express Sports). pic.twitter.com/z5OyuBhIlO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 23, 2025
अलिकडेच पृथ्वी शॉ मुंबई टी-२० लीगमध्ये खेळताना दिसला. जिथे त्याने कर्णधार म्हणूनही शानदार खेळी केली. आयुष म्हात्रे आणि यशस्वी जयस्वाल यांच्याव्यतिरिक्त आता मुंबई संघात सलामी फलंदाजीसाठी अंगकृष रघुवंशीचा पर्यायही आहे. त्यामुळे शॉला खेळण्याची संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत, आता पृथ्वी शॉला विश्वास आहे की त्याला दुसऱ्या राज्याच्या संघात खेळण्याची संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत, तो आता त्याच्या कारकिर्दीत पुढे जाऊ इच्छितो.