Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs BAN Match : शुभमन गिलची शानदार शतकी खेळी; टीम इंडियाची विजयी सलामी; बांगलादेशवर 6 विकेट राखून मिळवला विजय

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशवर शानदार विजय प्राप्त करीत विजयी सलामी दिली. कर्णधार रोहित शर्माची वेगवान सुरुवात आणि शुभमन गिलच्या शतकी खेळीने विजय साकार झाला.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 20, 2025 | 10:58 PM
Champions Trophy 2025 India vs Bangladesh Match India's Winning Start A Brilliant Victory Over Bangladesh

Champions Trophy 2025 India vs Bangladesh Match India's Winning Start A Brilliant Victory Over Bangladesh

Follow Us
Close
Follow Us:

Champions Trophy 2025 India vs Bangladesh Match : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताला बांगलादेशने गोलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजीचा निर्णय बांगलादेशला चांगलाच महागात पडला अवघ्या 228 धावांवर बांगलादेशचा संघ गारद झाला. सुरुवात डळमळीत झाली परंतु बांगलादेशकडून तोहिद ऱ्हिदोय आणि जाकर अलीने चांगली भागीदारी करीत संघाला 228 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. 229 धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात करीत विजयाचा पाया रचला. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करीत भारताला चांगली सुरुवात करून दिली. तसेच शुभमन गिलने संयमी खेळी दाखवत शानदार शतक ठोकले.  उपकर्णधार शुभमन गिलच्या शानदार शतकाने भारताला विजयापर्यंत नेले. त्याला केएल राहुलने चांगली साथ दिली.

शुभमन गिलची शतकी खेळी

Sensational Shubman in prolific form! 🔥

Back to Back ODI HUNDREDS for the #TeamIndia vice-captain! 🫡🫡

Updates ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#BANvIND | #ChampionsTrophy | @ShubmanGill pic.twitter.com/gUW8yI8zXx

— BCCI (@BCCI) February 20, 2025

 

शुभमन गिलची शानदार खेळी

Classy and consistent as ever! ✨

1⃣6⃣th ODI FIFTY for Shubman Gill 👏👏

Follow the Match ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#TeamIndia | #BANvIND | #ChampionsTrophy | @ShubmanGill pic.twitter.com/4nvl8Bw90H

— BCCI (@BCCI) February 20, 2025

 

भारताची फलंदाजी

कर्णधार रोहित शर्माने डावाची धमाकेदार सुरुवात करीत 36 चेंडूत वेगवान 41 धावा केल्या. त्यानंतर किंग कोहलीकडून विशेष अपेक्षा असताना विराट कोहली 22 धावांवर रिशाद होसेनच्या चेंडूवर बाद झाला. श्रेयस अय्यरने 17 चेंडूत 15 धावा केल्या तर अक्षर पटेलने 12 चेंडूत 8 धावा केल्या. शुभमन गिलने शानदार संयमी खेळी करीत भारताला विजयापर्यंत नेले. केएल राहुलने त्याला चांगली साथ दिली.

शुभमन गिलचा शानदार षटकार

9️⃣8️⃣metres 😲

A breathtaking six from Shubman Gill.

Watch LIVE on @StarSportsIndia in India.

Here's how to watch LIVE wherever you are 👉 https://t.co/AIBA0YZyiZ pic.twitter.com/LgIK5AjixQ

— ICC (@ICC) February 20, 2025

बांगलादेशची डळमळीत सुरुवात

आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश सामना सुरू आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, त्यांचा हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले. टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशची गाडी घसरल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशची सुरुवात अत्यंत डळमळीत झाली. सलामीवीर तान्झीद हसन आणि सोमय्य सरकार यांची जोडी लकरच फुटली. सलामीवीर सोमया सरकार हा शून्यावरच बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार नजमुल हुसेन शांतोला हर्षित राणाने कोहलीद्वारा झेलबाद करीत अवघ्या (0) शून्यावर तंबूत पाठवले.

मोहम्मद शमीची शानदार गोलंदाजी, 200 बळींचा टप्पा केला पार

बांगलादेशची फलंदाजी
बांगलादेशच्या पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर सुरुवात खूपच डळमळीत झाली. मेंहदी हसन मिर्झासुद्धा आज विशेष चमत्कार दाखवू शकला नाही. त्याने अवघ्या 5 धावा केल्या. परंतु, तोहिक ऱ्हिदोयने खेळपट्टीवर मजबूत उभे राहून संघासाठी शतकी खेळी केली. त्याला जाकर अलीने तेवढीच चांगली साथ दिली. जाकर अलीने 114 चेंडूत 68 धावा केल्या. रिषाद हुसेन, तान्झीम हसन साकीब, तस्कीन अहमद पूर्णपणे फ्लॉप ठरले. बांगलादेशकडून तौहीद ऱ्हिदोय आणि जाकर अलीने शानदार खेळी करीत बांगलादेशला एक सन्मानजनक स्कोअरपर्यंत नेले. परंतु बांगलादेशचा डाव 228 धावांवर संपुष्टात आला. भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य दिले.
दुबईमध्ये धावांचा पाठलाग करणे सोपे
दुबईमध्ये धावांचा पाठलाग करणे नेहमीच सोपे असते. आतापर्यंत येथे ५८ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने ३४ वेळा विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त २२ सामने जिंकता आले आहेत. दुबईमध्ये संध्याकाळी भरपूर दव पडतो पण गेल्या काही दिवसांत दव पडलेला नाही. हा सामना नवीन खेळपट्टीवर खेळला जात आहे आणि त्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
बांगलादेशने स्वतःच्या पायवर पाडला धोंडा
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ बांगलादेशचा सामना करीत आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. जरी या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानकडे असले तरी BCCI ने तिथे संघ पाठवण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे सामने दुबईमध्ये होत आहेत. भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध प्रथम गोलंदाजी करीत आहे. नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय बांगलादेशला चांगलाच महागात पडल्याचे दिसून आले. बांगलादेशने त्यांच्यात पायावर धोंडा पाडल्याचे दिसून आले.

Web Title: Champions trophy 2025 ind vs ban match shubman gills brilliant century indias winning start take a brilliant victory on bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 09:51 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Champions Trophy 2025
  • Harshit Rana
  • india
  • Mohammed Shami
  • Rohit Sharma
  • Shubman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
1

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
2

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
3

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

Arakan Army landmines : भारताच्या शेजारी म्यानमार अराकान आर्मी का रचत आहे जमिनीखाली ‘स्फोटक’ कटकारस्थान?
4

Arakan Army landmines : भारताच्या शेजारी म्यानमार अराकान आर्मी का रचत आहे जमिनीखाली ‘स्फोटक’ कटकारस्थान?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.