Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A vs SL A Controversy: वैभव सूर्यवंशीसोबतचा वाद नडला! श्रीलंकेच्या खेळाडूंवर कारवाईची कुऱ्हाड, डिकवेलाही अडचणीत

भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी याच्याशी झालेल्या वादात सहभागी असलेल्या खेळाडूंवर श्रीलंका क्रिकेटने कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशेन हलांबागेसह अनेक खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे, तर यष्टिरक्षक निरोशन डिकवेला याच्यावर एका वेगळ्या कारणास्तव शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 16, 2026 | 09:30 PM
वैभव सूर्यवंशीसोबतचा वाद नडला! श्रीलंकेच्या खेळाडूंवर कारवाईची कुऱ्हाड (Photo Credit- X)

वैभव सूर्यवंशीसोबतचा वाद नडला! श्रीलंकेच्या खेळाडूंवर कारवाईची कुऱ्हाड (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीसोबतचा वाद नडला!
  • श्रीलंकेच्या खेळाडूंवर कारवाईची कुऱ्हाड
  • डिकवेलाही अडचणीत
IND A vs SL A: १५ जून रोजी डंबुला येथे झालेल्या ‘इंडिया अ’ विरुद्ध ‘श्रीलंका अ’ सामन्यांनंतर निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आता संबंधित खेळाडूंवर उमटले आहेत. सामना संपल्यानंतर भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि ‘श्रीलंका अ’च्या काही खेळाडूंमध्ये झालेली शाब्दिक चकमक आणि त्यानंतर झालेली झटापट यांमुळे ‘श्रीलंका क्रिकेट’ने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. ‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, ‘श्रीलंका क्रिकेट’ने सामन्यानंतरच्या वादात सहभागी असलेल्या खेळाडूंना दंड ठोठावला आहे. यामध्ये श्रीलंकेचा खेळाडू विशेन हलांबागे याचाही समावेश आहे, ज्याची वैभव सूर्यवंशीसोबत शाब्दिक चकमक झाली होती आणि त्याचे रूपांतर नंतर झटापटीत झाले होते.
🚨 Vishen Halambage is understood to have been fined by match referee Pradeep Jeyapragash following his on-field spat with Vaibhav Sooryavanshi It is unclear yet whether Sooryavanshi has been sanctioned 📷: SLC#INDAvsSLA pic.twitter.com/HHi6H6z3Fu — Cricbuzz (@cricbuzz) June 16, 2026

तथापि, ‘श्रीलंका क्रिकेट’ने प्रत्येक खेळाडूवर नेमकी काय दंडात्मक कारवाई केली आहे, हे अद्याप जाहीर केलेले नाही. संबंधित खेळाडूंचे सामन्याचे मानधन (मॅच फी) कापण्यात आल्याचे वृत्त असले तरी, या कारवाईबाबतचा तपशील अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. या सामन्यासाठी प्रदीप जयप्रकाश हे सामनाधिकारी (मॅच रेफरी) होते आणि त्यांच्या स्तरावर घटनेचा आढावा घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेबाबत भारतीय खेळाडूंवर काही कारवाई करण्यात आली आहे की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Team India: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! एकाच दिवशी टीम इंडियाचे तब्बल ३ मोठे सामने; वेळापत्रक लगेच नोट करून ठेवा

मध्यस्थी करूनही डिकवेलाला दंड

या वृत्तातील आणखी एक रंजक बाब म्हणजे, ‘श्रीलंका अ’चा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेला याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, डिकवेला त्या खेळाडूंपैकी एक होता ज्यांनी हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी केली होती; त्याने वैभव सूर्यवंशी आणि विशेन हलांबागे यांना वेगळे करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला होता.

पाहा व्हिडिओ

🚨 HEATED ARGUMENT BETWEEN VAIBHAV AND SRI LANKA 🚨 Sri Lankan Players : This is not an IPL, this Int’l cricket 🧐 Vaibhav Sooryavanshi : This is not the end of the tournament, just a normal match 🤪 Sri Lankan started this and Vaibhav ended it 😳pic.twitter.com/QDNbFftd0t — Ajay Jadeja (@AjayJadeja171) June 15, 2026


मिळालेल्या माहितीनुसार, डिकवेलावर केलेली शिस्तभंगाची कारवाई ही सूर्यवंशी-हलांबागे यांच्यातील वादाशी संबंधित नसून, सामन्यादरम्यान केलेल्या अति-अपील करण्याच्या कृतीमुळे करण्यात आली आहे. परिणामी, त्यालाही दंडाला सामोरे जावे लागले.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ‘इंडिया अ’ आणि ‘श्रीलंका अ’ यांच्यातील सामना ‘सुपर ओव्हर’पर्यंत रंगला होता. सामन्याच्या या रोमांचक समाप्तीनंतर खेळाडूंमधील तणाव वाढला होता, ज्यामुळे ‘श्रीलंका क्रिकेट’ने कठोर भूमिका घेत संबंधित खेळाडूंवर कारवाई केली.

India A संघात ‘या’ अफलातून खेळाडूची एन्ट्री; बीसीसीआयने केली मोठी घोषणा, कारण काय?

Web Title: Clash with vaibhav suryavanshi proves costly sri lankan players face disciplinary action dickwella also in trouble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • cricket news
  • IND A vs SL A
  • Sports News
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

उंट, घोडा अन्…! बुद्धिबळाच्या पटावर आंतरराष्ट्रीय थरार; पुण्यात जगभरातून तब्बल 400…
1

उंट, घोडा अन्…! बुद्धिबळाच्या पटावर आंतरराष्ट्रीय थरार; पुण्यात जगभरातून तब्बल 400…

वादळी कामगिरी! Commonwealth मध्ये मेडल अन् ‘या’ खेळाडूंचा MP सरकार करणार सन्मान; 25 लाख अन् सरकारी…
2

वादळी कामगिरी! Commonwealth मध्ये मेडल अन् ‘या’ खेळाडूंचा MP सरकार करणार सन्मान; 25 लाख अन् सरकारी…

Commonwealth Games 2026: अस्मिता डे ने रचला इतिहास, Judo मध्ये कमावले पहिले Gold Medal; भारताची मान उंचावली
3

Commonwealth Games 2026: अस्मिता डे ने रचला इतिहास, Judo मध्ये कमावले पहिले Gold Medal; भारताची मान उंचावली

जिद्दीला सलाम! हताश न होता ग्रामीण लेकरांच्या स्वप्नांना दिली ढाल; राजू मुजावर यांची ‘न भूतो’ कामगिरी
4

जिद्दीला सलाम! हताश न होता ग्रामीण लेकरांच्या स्वप्नांना दिली ढाल; राजू मुजावर यांची ‘न भूतो’ कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.