BCCI and TATA Group Joint Venture : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या प्लेऑफ टप्प्यात टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलसाठी झाडे लावण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गेल्या हंगामात टाटा समूहासोबत भागीदारी केली. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून 1 लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची मजेदार पोस्ट इंस्टावर चांगलीच व्हायरल होत आहे.
1 लाख रोपांची होणार लागवड
IPL मध्ये सर्व मॅचदरम्यान झालेल्या डॉट बॉलची भरपाई 1-1 रोप लावून होणार आहे. हा उपक्रम बीसीसीआय आणि टाटा समूहा यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे होणार आहे. यामध्ये आता 1 लाख रोपांची लागवड होणार आहे. एका अभिनव उपक्रमाची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा उपक्रमाची क्लृप्तीसुद्धा फारच सुंदर आहे. याची एक पोस्ट इंस्टावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
कोलकाता ठरली चॅम्पियन
या आय़पीएलमध्ये कोलकाता विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात फायनल मॅच झाली. यामध्ये कोलकाताने हैद्राबादवर एकतर्फी विजय मिळवत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. या हंगामात हैद्राबादने आपल्या फलंदाजीने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. परंतु, फायनल मॅचमध्ये कोलकाताच्या गोलंदाजांसमोर सनरायझर्सचे सर्व खेळाडू निष्प्रभ ठरली आणि कोलकाताने सहज विजय प्राप्त केला.