डोंगरावरील क्रिकेट सामना(फोटो-सोशल मीडिया)
Viral video of cricket on the mountain: क्रिकेट या खेळाच भारतात प्रचंड वेड आहे. भारतात क्रिकेट हा खेळ सर्वाधिक पाहिला आणि खेळला जात असतो. या आपल्या देशात क्रिकेटपटूंना देवाचा दर्जा देऊन पुजलं देखील जातं. भारतातील प्रत्येक रस्त्यावर आणि गल्लीत क्रिकेट खेळताना कित्येक क्रिकेटप्रेमी दिसून येतील. तसेच क्रिकेटवर तासनतास गप्पा मारणारे क्रिकेट तज्ञ देखील तुम्हाला भारतातच बघायला मिळतील. क्रिकेट वेड काय असतं हे दाखवून देणारा एक व्हिडिओ सद्या शोधलं मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये, एक गट डोंगराच्या माथ्यावर क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. जिथे खेळपट्टी सरळ नाही तर उंच असल्याचे दिसत आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : शुभमन गिल ठरला चौथ्यांदा ICC Player of the Month चा विजेता! ‘या’ दोन मातब्बर खेळाडूंना दिला धोबीपछाड
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये कोणते चांगले स्टेडियम दिसून नसून एक टेकडी दिसत आहे, जिथे लोक क्रिकेटचा आनंद लुटत असल्याचे दिसत आहेत. लोक सोशल मीडियावर या सामन्याचा आनंद घेत आहेत. या दरम्यान, फलंदाज डोंगराच्या उंचीवर फलंदाजी करत असून दुसरीकडे, क्षेत्ररक्षक डोंगराच्या खाली क्षेत्ररक्षण करताना पळत आहेत.
या सामन्याची खेळपट्टी अजिबात सपाट नसून यामुळेच गोलंदाजाला चेंडू जोराने वर फेकावा लागत आहे. गोलंदाजासाठी हे एक मोठे आव्हान असल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसते की स्टंप डोंगराच्या माथ्यावर रोवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत गोलंदाजाला पूर्ण ताकदीने चेंडू फेकावा लागतया आहे.
Slope pro max 😂 pic.twitter.com/MkGlbV720f
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) August 10, 2025
हेही वाचा : फ्रांसच्या खेळाडूचा टी२० मध्ये विश्वविक्रम! ‘या’ पराक्रमाने क्रिकेट विश्वालाही केले चकित..
बॅट्समनला एका टेकडीच्या माथ्यावर फुल टॉस बॉल मिळाला, ज्यावर त्याने एक शानदार शॉट मारला आहे. त्यानंतर तो धाव घेण्यासाठी खाली घसरला जे पाहून प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. धाव पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या फलंदाजाला डोंगरावर चढत असल्याचे दिसत आहे. दोघांनीही दोन धावा घेतल्या, परंतु स्ट्राइक बदलण्यासाठी फलंदाजाला पुन्हा टेकडीवर चढण्यासाठी संघर्ष करावा लागला. हा मजेदार व्हिडिओ आउट ऑफ कॉन्टेक्स्ट क्रिकेटच्या एक्स-अकाउंटवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडल्याचे दिसत आहे.