झहीर झहिरी(फोटो-सोशल मीडिया)
France’s Zaheer Zaheer sets world record : क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये दिवसागणिक वेगवेगळे विक्रम रचले जातात. तर काही विक्रम मोडले देखील जातात. खेळाडूंकडून अनेकदा मैदानात आश्चर्यकारक कामगिरी केल्याचे अनेकदा नघण्यात येते.अशाच प्रकारे क्रिकेट जगताला धनिक देणारी कामगिरी फ्रान्सच्या एका खेळाडूने केली आहे. फ्रान्सच्या झहीर झहिरी या खेळाडूने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात धावांचा यशस्वी पाठलाग करताना १० किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात मोठी खेळी खेळून विश्वविक्रम रचला आहे. स्वीडनविरुद्धच्या सामन्यात यशस्वी धावांचा पाठलाग करताना झहीर झहिरीने ३४ धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.
झहीर झहिरीने मोठी कामगिरी केलीय आहे. त्याने आता टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात यशस्वी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक खेळी खेळणारा १० किंवा त्याखालील क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. असे करून झहीरने पाकिस्तानच्या नसीम शाह आणि बेल्जियमच्या सज्जाद अहमदझाई यांचा विक्रम मोडीत काढला आहे.
हेही वाचा : अबब! याला काय अर्थ? तब्बल १० फलंदाज शून्यावर बाद; ‘या’ संघाने २ चेंडूत साकारला टी२० सामन्यात विजय..
२०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात यशस्वी धावांचा पाठलाग करत असताना पाकिस्तानच्या नसीम शाहने १० व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन नाबाद १७ धावांची खेळी केली होती. त्याच वेळी, बेल्जियमच्या सज्जाद अहमदझाईने स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात १० व्या क्रमांकावर यशस्वी धावांचा पाठलाग करत नाबाद १७ धावा केल्या होत्या.
हेही वाचा : Asia cup 2025 साठी टीम इंडियाचा संघ कसा असेल? कोणाची लागणार वर्णी? कोण जाणार बाहेर? जाणून घ्या…
वायकिंग कप २०२५ मधील तिसऱ्या स्थानासाठीचा प्ले ऑफ खूपच रंजक पद्धतीने संपला, फ्रान्सने स्टॉकहोममधील बोटकीर्का क्रिकेट सेंटरमध्ये फक्त पाच चेंडू शिल्लक असताना स्वीडनवर दोन गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात स्वीडनने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी बाद १५२ धावा केल्या होत्या. त्यानंतर फ्रान्सने शेवटच्या षटकात दोन गडी राखून सामना आपल्या नवे करण्यात यश मिळवले. फ्रान्सकडून १० व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन झहीर झहिरीने १६ चेंडूत ३४ धावांची नाबाद स्फोटक खेळी केली. यामध्ये त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले.