फोटो सौजन्य - सोशल मिडीया
क्रिस्टियानो रोनाल्डोने रचला इतिहास : क्रिस्टियानो रोनाल्डोचे नाव हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेले आहे, क्रिस्टियानो रोनाल्डोचे चाहते हे त्याला मनापासून फॉलो करतात. क्रिस्टियानो रोनाल्डो हे असे नाव आहे ज्या व्यक्तीला माहीत असते ज्याने फुटबॉल खेळला नाही किंवा तो पाहिला नाही त्याला सुद्धा क्रिस्टियानो रोनाल्डोचे नाव माहिती आहे. पोर्तुगाल संघाचा स्टार फुटबॉलपटू त्यांच्या चमकदार खेळासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. रोनाल्डोला सध्या फुटबॉल विश्वातील सर्वोत्तम खेळाडू म्हटले जाते. सोशल मीडियावरही त्याची चांगलीच पकड आहे. इंस्टाग्रामवर तो जगातील सर्वाधिक फॉलोअर्स त्याचे आहेत.
आता रोनाल्डोने सोशल मीडियावर नवा इतिहास रचला आहे. रोनाल्डोने सांगितले की त्याने सोशल मीडियावर (सर्व प्लॅटफॉर्मवर एकत्रित) 1 अब्ज फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. X वर त्याने पोस्ट शेअर केली आहे, ट्विटरवर (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टमध्ये महान फुटबॉलपटूने त्याच्या 1 अब्ज फॉलोअर्सची माहिती दिली. या खास प्रसंगी रोनाल्डोने त्याच्या चाहत्यांसाठी एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली. “आम्ही इतिहास घडवला – 1 अब्ज फॉलोअर्स! हे फक्त एका संख्येपेक्षा जास्त आहे – हे आमच्या सामायिक उत्कटतेचा, उत्साहाचा आणि खेळासाठी आणि त्याही पुढे असलेल्या प्रेमाचा पुरावा आहे,” रोनाल्डोने लिहिले.
We’ve made history — 1 BILLION followers! This is more than just a number – it’s a testament to our shared passion, drive, and love for the game and beyond.
From the streets of Madeira to the biggest stages in the world, I’ve always played for my family and for you, and now 1… pic.twitter.com/kZKo803rJo
— Cristiano Ronaldo (@Cristiano) September 12, 2024
त्यानंतर त्यांनी पुढे लिहिले की, “मंडीरा येथील रस्त्यांपासून ते जगातील सर्वात मोठ्या मंचापर्यंत, मी नेहमीच माझ्या कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी खेळलो आहे आणि आता आमच्यापैकी 1 अब्ज लोक एकत्र उभे आहेत. तुम्ही माझ्या प्रत्येक पायरीवर, प्रत्येक चढ-उतारावर माझ्यासोबत आहात. हा प्रवास आपला प्रवास आहे आणि आम्ही मिळून हे दाखवून दिले आहे की आम्ही जे काही साध्य करू शकतो त्याला मर्यादा नाहीत. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, तुमच्या समर्थनासाठी आणि माझ्या जीवनाचा एक भाग असल्याबद्दल धन्यवाद. सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे आणि आम्ही एकत्र प्रयत्न करत राहू, जिंकत राहू आणि इतिहास घडवू.”