क्रांती गौडचा सन्मान (फोटो- ट्विटर)
या विशेष कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज असलेल्या क्रांती गौडचा सत्कार केला. तसेच तिच्या कुटुंबाचा देखील सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी लॉर्डस मैदानावर इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या क्रांती गौडचा सन्मान केला. क्रांती गौड ही मध्यप्रदेश राज्याची रहिवासी आहे.
क्रांती गौडने लॉर्डस मैदानावर ‘टेस्ट ऑनर्स बोर्ड’ वर आपले नाव नोंदवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेट संघातील पहिली खेळाडू ठरली आहे. तीने इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात क्रांती गौडने 7 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली आहे.
लार्ड्स क्रिकेट मैदान के ऑनर बोर्ड पर अपना नाम दर्ज कराने वाली देश की पहली महिला क्रिकेटर और हमारे छतरपुर की बिटिया क्रांति गौड़ को आज सम्मानित कर उज्ज्वल भविष्य की शुभकामनाएं दीं। बेटी क्रांति ने अपनी प्रतिभा और उत्कृष्ट प्रदर्शन से विश्व पटल पर मध्यप्रदेश एवं देश का गौरव… pic.twitter.com/Q9PRDkqiHF — Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) July 22, 2026
यावेळेस मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी क्रीडा तथा युवाक कल्याण, मध्यप्रदेश सरकारने 3 लाख रुपयांचा धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. तसेच प्रोत्साहन स्वरूपात क्रांती गौडला 2 लाख रुपयांची बक्षीस रक्कम सुपूर्त करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी वडील नरसिंह, भाऊ महेंद्रसिंह यांचा देखील सरकारतर्फे सत्कार करण्यात आला.
इंग्लंडमध्ये घुसून धुमाकूळ! ऐतिहासिक कामगिरीबद्दल Kranti Gaud चा मध्यप्रदेश सरकारकडून सन्मान
मध्य प्रदेशातील क्रीडा क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात सरकार खेळाडूंना सर्वोत्कृष्ट क्रीडा पायाभूत सुविधा, उच्चस्तरीय ट्रेनिंग आणि आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट केले आहे.
रणरागिणी भडकल्या अन् क्रिकेटच्या पंढरीत…! HarmanPreet Kaur ने इंग्लंडविरुद्ध मोडला ‘हा’ महारेकॉर्ड
क्रांती गौडने रचला इतिहास
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात क्रांती गौडने इतिहास रचला. दिवसअखेरपर्यंत इंग्लंड महिला संघाचीही एक विकेट पडली होती. दुसऱ्या दिवशी, इंग्लंडच्या फलंदाजांना क्रांती गौडच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करावा लागला. क्रांती गौड महिला क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेणारी पहिली गोलंदाज ठरली आहे. तिने १७ षटकांत ३७ धावा देत पाच विकेट्स घेतले. क्रांतीने माया बाउचर, टॅमी ब्यूमोंट, नॅट सायव्हर ब्रंट, एलिस कॅप्सी आणि लॉरेन बेल यांचे विकेट्स घेतले.






