डेवाल्ड ब्रेव्हिस(फोटो-सोशल मीडिया)
CSK vs PBKS : काल झालेल्या आयपीएल २०२५ मधील ४९ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला आहे. या सामन्यात पंजाबने चेन्नईचा पराभव केला. या परभवासोबतच चेन्नईचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी उतरेलल्या चेन्नईने सॅम करनच्या ८८ धावांच्या जोरावर १९० धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात पंजाबने प्रभसीमरन आणि अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर हे लक्ष्य सहज पूर्ण करून दणदणीत विजय साजरा केला. या सामन्यात चेन्नईच्या डेवाल्ड ब्रेव्हिस चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने टिपलेला अफलातून झेल सर्वांच्याच लक्षात राहीला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो उडी मारताना दिसून येत आहे.
आयपीएलच्या १८ व्या हंगामात आतापर्यंत अनेक आश्चर्यकारक झेल बघायला मिळाले आहेत. अनेक झेल इतके कठीण होते की ते पकडणे अशक्य वाटत असताना खेळाडूंनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दाखवत ते टिपले. बुधवारी चेन्नई आणि पंजाबच्या सामन्यात असाच एक झेल पाहायला मिळाला, जिथे बेबी एबी म्हणून ओळखला जाणारा डेव्होल्ड ब्रेव्हिसने हवेत उडून एक अद्भुत असा झेल घेतला.
१८ व्या षटकात रवींद्र जाडेजा गोलंदाजीसाठी आला आणि त्याच्या तिसऱ्या चेंडूवर, शशांक सिंगने मिड-विकेटच्या दिशेने हवेत स्वीप शॉट मारला. तिथे उभ्या असलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिसला उजवीकडे धावावे लागले, त्याने चेंडूसाठी हात पुढे केला आणि तो पकडला, पण त्याचा तोल गेला आणि चेंडू सीमारेषेवरून जाऊ लागल्याचे लक्षात आले. तो बाहेर गेला, पण त्याने चेंडू हवेत फेकून दिला. त्यानंतर बेबी एबीने पुन्हा हवेत उडी मारली, पण तरीही तो बाहेर येऊ शकला नाही, म्हणून त्याने पुन्हा चेंडू हवेत फेकला, पण त्याची नजर चेंडूवरून सरकली नाही. शेवटी झेल घेण्यासाठी त्याला ३ वेळा सीमा ओलांडून उडी मारावी लागली होती. या विकेटपूर्वी शशांक सिंगने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर सलग एक चौकार आणि एक षटकार लगावला होता. इतके करून सुद्धा चेन्नई सुपर किंग्जला सामना राखता आला नाही आणि पंजाबने २ चेंडू शिल्लक ठेवून लक्ष्य पूर्ण केले आणि ४ विकेट्सने चेन्नईवर विजय मिळवला.
WHAT. A. CATCH 🔥
An absolute stunner from Dewald Brevis at the boundary😍
Excellent awareness from him 🫡
Updates ▶ https://t.co/eXWTTv7Xhd #TATAIPL | #CSKvPBKS | @ChennaiIPL pic.twitter.com/CjZgjdEvUQ
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2025
सीएसकेने प्रथम फलंदाजी करत १९० धावा केल्या होत्या, असे वाटत होते की चेन्नई सहज २०० च्यावर धावा करेल. परंतु, जर युजवेंद्र चहलने १९ व्या षटकात हॅट्रिक घेतली आणि चेन्नईचे मनसुबे उधवस्त झाले. या षटकात चहलने दुसऱ्याच चेंडूवर एमएस धोनीला बाद केले. यानंतर, त्याने चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर दीपक हुडा, अंशुल कंबोज आणि नूर अहमदला बाद करून आयपीएल २०२५ मधील पहिली हॅटट्रिक घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंगने ३६ चेंडूत ५४ धावा केल्या. तर कर्णधार श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ७२ धावा केल्या. या विजयासह, पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे.