ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतो. भारतात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक खास दिवशी तो त्याच्या भारतीय चाहत्यांसाठी काही खास पोस्ट शेअर करतो. भारतीय चाहते देखील त्याच्या पोस्टला पसंती दर्शवतात. आज गणेश चतुर्थीच्या दिवशीही वॉर्नरने अशीच एक खास पोस्ट शेअर करत भारतीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने वॉर्नरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो श्री गणेशासमोर हात जोडताना दिसतोय. या फोटोसोबतच त्याने गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. वॉर्नरनं लिहिलंय की, “भारतात उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.” या आधीही भारतीय चित्रपट, गाणी, खाद्यपदार्थ, कपडे इत्यादींशी संबंधित डेव्हिड वॉर्नरनं अनेक पोस्ट केल्या आहेत.
वॉर्नरच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असून या पोस्टला आतापर्यंत १३ लाखांहून अधिक युजर्सनी लाईक्स केल आहे. त्यावर ३० हजारांहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत. अनेक चाहत्यांनी त्याला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.