Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs MI : ‘THANK YOU MUMBAI!’, IPL च्या प्लेऑफमध्ये थाटात प्रवेश केल्यानंतर वानखेडेवर मुंबईने प्रेक्षकांचे मानले आभार..

आयपीएल २०२५ चा ६३ व्या सामन्यात काल वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या विजयासह मुंबई प्लेऑफमध्ये पोहचली आहे. यावेळी मुंबईने प्रेक्षकांचे आभार मानले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 22, 2025 | 07:39 AM
DC Vs MI: 'THANK YOU MUMBAI!', Mumbai thanked the audience at Wankhede after entering the IPL playoffs in style.

DC Vs MI: 'THANK YOU MUMBAI!', Mumbai thanked the audience at Wankhede after entering the IPL playoffs in style.

Follow Us
Close
Follow Us:

DC Vs MI : आयपीएल २०२५ चा ६३ वा सामना काल वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी दणदणीत पराभव केला. यासह, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला  आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने सूर्यकूमर यादवच्या ४३ चेंडूत काढलेल्या ७३ धावांच्या जोरावर दिल्लीसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, डीसी धावांचा पाठलाग करताना १८.२ षटकांत केवळ १२१ धावांपर्यंतच पोहचू शकला. परिणामी एमआयने हा सामना ५९ धावांच्या फरकाने आपल्या खिशात टाकला.

मुंबईच्या या विजयाचा खरा होरो ठरला तो म्हणजे सूर्यकुमार यादव. त्याने कठीण परिस्थितीत संघासाठी ४३ चेंडूचा सामना करत ७३ धावांची महत्त्वाची खेळी खेळली. या दरम्यान त्याने ७ चौकार आणि ४ षटकार लगावले. विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे अभिवादन केले.

एमआय प्रेक्षकांचे मानले आभार..

हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये दिल्लीला हरवून प्लेऑफमध्ये मोठ्या दिमाखात प्रवेश मिळवला. सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून मुंबई इंडियन्सला पूर्ण पाठिंबा देण्यात आला. मुंबईच्या प्रत्येक सीमेवर प्रेक्षकांकडून खूप गोंधळ घालण्यात आला. याला उत्तर देताना मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी त्यांच्या खास शैलीत प्रेक्षकांचे आभार मानले.

हेही वाचा : MI Vs DC: दिल्ली कॅपिटल्सचे घामटे निघाले, मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सचा कहर; Playoff मध्ये दिमाखात एंट्री

सामना संपल्यानंतर, मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू प्रेक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी मैदानावर आले. यावेळी, एमआयच्या खेळाडूंनी हातात एक भला मोठा बॅनर धरला होता. खेळाडूंनी हा बॅनर हातात घेऊन मैदानात एक फेरी मारली. या बॅनरवर ‘थँक यू मुंबई’ असे मोठ्या अक्षरात लिहिलेले होते. मुंबईकडून आलेल्या या शुभेच्छाचे प्रेक्षकांनीही मोठ्या आनंदाने स्वीकार केला.

सूर्यकुमार यादव आणि नमन धीर चमकले

सूर्यकुमार यादवने मुंबईचा डळमळीत झालेला डाव सावरला. तसेच त्याला यावेळी नमन धीरची मोठी साथ मिळाली. दोघांनी मिळून संघाची  धावसंख्या १८० धावांपर्यंत नेऊन पोहचवली. सूर्यकुमार यादवने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४३ चेंडूचा सामना करत ७३ धावांची नाबाद जलद खेळी केली. याशिवाय, नमन धीरने अखेर ३०० च्या स्ट्राईक रेट राखत २४ धावा केल्या.

11th time Mumbai Indians qualified for Playoffs 🔥🔥🔥

Thank you MUMBAI 🙌🙌🙌#MIvsDC #DCvsMI #MIvDC #DCvMI pic.twitter.com/1WseEmgbFb

— The Sports Feed (@thesports_feed) May 21, 2025

मुंबईची शनादार गोलंदाजी

काल झालेल्या सामन्यात  मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. संघाकडून जसप्रीत बुमराह आणि मिशेल सँट्रान यांनी प्रत्येकी  ३ विकेट मिळवल्या. यामुळेच दिल्लीचा संघ १२१ धावांवर सर्वबाद  झाला. तसेच  ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, विल जॅक्स आणि कर्ण शर्मा यांनी देखील प्रत्येकी १ विकेट घेऊन संघला विजयापर्यंत पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली.

हेही वाचा : ‘धोनीच्या जागी मी असतो तर संन्यास…’ भारताच्या पूर्व कोचने साधला निशाणा, म्हणाला आता थांबण्याची वेळ

दिल्ली प्लेऑफमधून पत्ता कट

मुंबई इंडियन्सकडून झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. यानंतर दिल्लीला पंजाब किंग्जविरुद्ध सामना खेळायचा आहे. दिल्ली आणि पंजाब दोघांसाठीही हा सामना केवळ एक औपचारिकता असणार आहे. असेल.

 

Web Title: Dc vs mi mumbai thanked the audience by saying thank you after entering the ipl playoffs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 07:39 AM

Topics:  

  • Axar Patel
  • DC Vs MI
  • Hardik Pandya
  • IPL 2025
  • Rohit Sharma
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
1

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
2

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
3

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य
4

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.