Mumbai Indians चा दिमाखात प्लेओफमध्ये प्रवेश (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
पावसाचे सावट असतानाही मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२५ चा ६३ वा सामना बुधवारी (२१ मे) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला आणि दोन्ही संघाचे पारडे जड होते. मात्र अगदी सहजपणे आपले वर्चस्व राखत मुंबई इंडियन्सने ही मॅच आपल्या खिशात घातली आहे आणि इतकेच नाही तर Playoff मध्ये चौथे स्थान पटकवत आपली पुढली वाट मोकळी केली आहे.
वानखेडे स्टेडियमवरील हा सामना दिल्लीसाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांचा कार्यवाहक कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार अक्षर पटेल दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. मुंबई इंडियन्सने २० षटकांत ५ बाद १८० धावा केल्या आणि १८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र दिल्लीच्या समीर रिझवी व्यतिरिक्त संघातील इतरांनी चांगली कामगिरी दाखवली नाही.
सूर्या तळपला
मुंबईकडून सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांनी शेवटच्या दोन षटकांत जोरदार धावा केल्या. सूर्यकुमारने ४३ चेंडूत ७३ धावा केल्या आणि नमन धीरने ८ चेंडूत २४ धावा केल्या आणि नाबाद राहिला. सूर्यकुमारने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. नमनच्या बॅटमधून २ चौकार आणि २ षटकार आले. दोघांनीही २१ चेंडूत ५७ धावांची भागीदारी केली. तिलक वर्माच्या बॅटमधून २७ धावा आल्या. त्याच्याशिवाय मुंबईकडून रायन रिकेल्टनने २५ आणि विल जॅक्सने २१ धावा केल्या. रोहित शर्मा ५ धावा काढून बाद झाला आणि हार्दिक पंड्या ३ धावा काढून बाद झाला. दिल्लीकडून मुकेश कुमारने २ विकेट घेतल्या. दुष्मंथ चामीरा, मुस्तफिजुर रहमान आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी १ यश मिळाले.
दिल्लीची अवस्था वाईट
दिल्ली कॅपिटल्सची अवस्था वाईट होती. काही षटकातच आपले पाच विकेट त्यांनी गमावले. संघाचा स्कोअर १० षटकांत ५ बाद ६५ धावा असा झाला होता. १० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने ट्रिस्टन स्टब्सला एलबीडब्ल्यू बाद केले. स्टब्सने ४ चेंडूत २ धावा केल्या. समीर रिझवी आणि आशुतोष शर्मा यांनी दिल्लीला वाचविण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला मात्र संघाला जिंकण्यासाठी लागणाऱ्या १८१ धावांचा टप्पा कोणीही गाठू शकले नाही. १६.३ ओव्हरमध्ये ११२ वर ८ विकेट इतकी बिकट अवस्था झाली होती.
CSK Vs RR: यशस्वी जयस्वालचा IPL मध्ये बोलबाला! बनवला महारेकॉर्ड; ठरला जगातील पहिला फलंदाज
अखेर विजय मिळवला
मुंबई इंडियन्सने ही मॅच आपल्या खिशात घातली आणि दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. करण शर्माने कुलदीप यादवची ९ वी विकेट काढली आणि मुंबईचा रस्ता अगदीच मोकळा झाला. तर बुमराहने विकेट घेत १२१ मध्ये संपूर्ण संघ गारद करत शेवटची विकेट मिळवली. ५९ रन्सने मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे.