Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs MI : Suryakumar Yadav चा टी-२० क्रिकेटमध्ये डंका! विश्वविक्रमाशी साधली बरोबरी; Sachin Tendulkar चा विक्रम खालसा.. 

आयपीएल २०२५ मध्ये काल पार पडलेल्या ६३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा परभव केला. या सामन्यात मुंबईचा सूर्यकुमार यादवने एका विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 22, 2025 | 12:12 PM
DC Vs MI: Suryakumar Yadav's dunk in T20 cricket! Equals world record; Sachin Tendulkar's record is broken..

DC Vs MI: Suryakumar Yadav's dunk in T20 cricket! Equals world record; Sachin Tendulkar's record is broken..

Follow Us
Close
Follow Us:

DC Vs MI : आयपीएल २०२५ मध्ये काल पार पडलेल्या ६३ व्या सामन्यात,  मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत  पराभव करून दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या या विजयात सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.  सूर्यकुमारच्या ४३ चेंडूत ७३ धावांच्या (७ चौकार आणि ४ षटकार) नाबाद खेळीच्या जोरावर त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाला २० षटकांत ५ गडी गमावून १८० धावांपर्यंत मजल मारता आली.  नंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ फक्त १२१ धावाच करू शकला. परिणामी मुंबईने हा सामना ५९ धावांनी आपल्या खिशात  टाकला. सूर्यकुमार यादवच्या या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताब प्रदान करण्यात आला आहे. या सामन्यात सूर्याने टी-२० मधील एका विश्वविक्रमाची बरोबरी साधली आहे.

सूर्याचा टी-२० मध्ये महापराक्रम

सूर्यकुमार यादवने एका विश्वविक्रमाशी बरोबरी केलीय आहे. त्याने आता टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा सलग २५+ धावा करण्याचा विक्रम रचला आहे.सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बावुमाच्या जागतिक विक्रमाची बरोबरी साधली आहे. टेम्बा बावुमाने टी-२० क्रिकेटमध्ये सलग १३ वेळा २५+ धावा करण्याचा भीम पराक्रम देखील केला आहे. सूर्याने लागोपाठ १३ वेळा टी-२० क्रिकेटमध्ये २५+ धावा करण्यात तो यशस्वी झाला आहे.

हेही वाचा : Rohit Sharma गेल्या ५ वर्षांपासून ‘त्या’ दुखण्याने हैराण! IPL 2025 नंतर ‘हिटमॅन’ला मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागणार..

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २५+ सलग धावा

  1.  सूर्यकुमार यादव (2025) -13*
  2.  टेंबा बावुमा (2019-20) – 13
  3.  ब्रॅड हॉज (२००५-०७) – ११
  4.  जॅक रुडोल्फ (२०१४-१५) – ११
  5.  कुमार संगकारा (2015) – 11

 सचिन तेंडुलकरचा विक्रम खालसा

या दरम्यान सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक सामनावीर विजेतेपद पटकावण्याच्या बाबतीत सूर्या चौथ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. सूर्याने मुंबई इंडियन्ससाठी एकूण ९ वेळा सामनावीराच्या पुरस्कारावर नाव कोरण्यात यश मिळवले आहे. सचिन  तेंडुलकरने मुंबई इंडियन्ससाठी खेळताना आठ वेळा सामनावीराचा किताब जिंकला होता. त्याच वेळी, आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा आहे. रोहितने मुंबईसाठी १७ वेळा सामनावीराचा किताब जिंकला आहे.

मुंबईसाठी सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू

  1.  रोहित शर्मा – १७
  2. किरॉन पोलार्ड – १४
  3. जसप्रीत बुमराह – १०
  4. सूर्यकुमार यादव – ९*
  5. सचिन तेंडुलकर – ८

हेही वाचा : LSG vs GT : गुजरात टायटन्सची नजर आता टॉप २ वर, तर लखनौ आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी उतरणार मैदानात…

तसेच सूर्यकुमार यादवने आयपीएल हंगामात सर्वाधिक सलग २५+ धावा करणारा फलंदाज ठरला आहे. असे करून त्याने  केन विल्यमसनची बरोबरी साधली आहे. २०१८ मध्ये, विल्यमसनने आयपीएलच्या एका हंगामात सलग १३ वेळा २५+ धावा करण्याचा विक्रम केला होता.

Web Title: Dc vs mi suryakumar yadav equals world record in t20 also breaks sachin tendulkars record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • DC Vs MI
  • IPL 2025
  • Rohit Sharma
  • Sachin Tendulkar
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
1

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल
2

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
3

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…
4

IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.