Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs RCB, WPL 2026: आज दिल्लीसाठी अस्तित्वाची लढाई! RCB चे असणार मोठे आव्हान

महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर सामना खेळला जाणार आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 24, 2026 | 02:24 PM
DC vs RCB, WPL 2026: आज  दिल्लीसाठी अस्तित्वाची लढाई! RCB चे असणार मोठे आव्हान

DC vs RCB, WPL 2026: आज  दिल्लीसाठी अस्तित्वाची लढाई! RCB चे असणार मोठे आव्हान

Follow Us
Close
Follow Us:

DC vs RCB, WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज १५ व्या सामन्यात  दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आमनेसामने येणार आहे. हा सामना नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे.  प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला शनिवारी येथे शानदार फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध प्रत्येक विभागात सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सने विजय मिळवत पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. या विजयासह दिल्ली चार गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. मात्र, या टप्प्यात अजिंक्य असलेल्या आरसीबीला हरवण्यासाठी दिल्लीला आपला खेळ आणखी उंचावावा लागेल.

हेही वाचा : IND vs NZ : सूर्यकुमार यादवबाबत केलेला दावा शिवम दुबेचा सिद्ध! म्हणाला – तेव्हा मी म्हटले होते की जगाला…

आतापर्यंत दिल्लीच्या फलंदाजीची धुरा अनुभवी लिजेल ली (२१३ धावा) हिने सांभाळली असून लॉरा वोलवार्ट (१२३) आणि शेफाली वर्मा (१४९) यांनी तिला वेळोवेळी साथ दिली आहे. जेमिमा रोड्रिग्सची फॉर्म मात्र चिंतेचा विषय ठरली होती. मात्र, मुंबईविरुद्धच्या सामन्यात तिने नाबाद अर्धशतक झळकावत आत्मविश्वास मिळवला असून आरसीबीविरुद्ध ही तिच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाजी विभागातही दिल्लीला काही त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या वेगवान गोलंदाज नंदिनी शर्मा हिने आतापर्यंत पाच सामन्यांत ८.७ इकॉनॉमीने १० बळी घेत गोलंदाजीची आघाडी घेतली आहे. मात्र, फिरकीपटू श्री चरणी  आणि स्नेह राणा अद्याप लयीत आलेल्या नाहीत.

दक्षिण आफ्रिकेची अनुभवी वेगवान गोलंदाज मरिझान काप हिने चार बळी घेतले असले तरी तिचा प्रभाव मर्यादित राहिला आहे, जरी तिची ५.२५ ची इकॉनॉमी उल्लेखनीय आहे. आरसीबीकडे फलंदाजीमध्ये कर्णधार स्मृती मंधाना आणि ग्रेस हॅरिस यांची भक्कम सुरुवात मिळत आहे. मधल्या आणि खालच्या फळीत नादिन डि क्लर्क आणि ऋचा घोष सातत्याने योगदान देत आहेत. गुजरात जायंट्सविरुद्ध ७३ धावांची दमदार खेळी करणाऱ्या गौतमी नाईकने आरसीबीच्या फलंदाजीला आणखी बळ दिले आहे.

गुणतालिकेत आरसीबी अव्वल स्थानी

 आरसीबीची गोलंदाजीही सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. सयाली सतघरे, डि क्लर्क, लॉरेन बेल आणि श्रेयंका पाटील सातत्याने बळी घेत असून पाच सामन्यांत त्यांची इकॉनॉमी अनुक्रमे ८, ६.९, ५.४ आणि ८.९ अशी आहे. आधीच १० गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलेल्या आरसीबीला हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखत थेट अंतिम फेरीकडे वाटचाल करायची आहे.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : स्मृती मंधाना (कर्णधार), ऋचा घोष, श्रेयंका पाटील, जॉर्जिया वोल, नादिन डि क्लर्क, राधा यादव, लॉरेन बेल, लिंडसे स्मिथ, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, ग्रेस हॅरिस, गौतमी नाईक, प्रत्युषा कुमार, डी हेमालता, सयाली सतघरे.

दिल्ली कॅपिटल्स: जेमिमा रोड्रिग्स (कर्णधार), शेफाली वर्मा, मरिझान काप, निकी प्रसाद, लॉरा वोलवार्ट, चिनेल हेन्री, श्री चरणी, स्नेह राणा, लिजेल ली, दिया यादव, तानिया भाटिया, ममता मडिवाला, नंदिनी शर्मा, लुसी हॅमिल्टन, मीनू मणी, अलाना किंग.

Web Title: Dc vs rcb wpl 2026 today rcb will pose a big challenge for delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • DC vs RCB
  • IND vs NZ
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs NZ : सूर्यकुमार यादवबाबत केलेला दावा शिवम दुबेचा सिद्ध! म्हणाला – तेव्हा मी म्हटले होते की जगाला…
1

IND vs NZ : सूर्यकुमार यादवबाबत केलेला दावा शिवम दुबेचा सिद्ध! म्हणाला – तेव्हा मी म्हटले होते की जगाला…

हार्दिक पांड्या आणि मुरली कार्तिकमध्ये मैदानावर बाचाबाची? नक्की झालं काय, सोशल मिडियावर Video Viral
2

हार्दिक पांड्या आणि मुरली कार्तिकमध्ये मैदानावर बाचाबाची? नक्की झालं काय, सोशल मिडियावर Video Viral

IND vs NZ : सुर्या दादाने आणखी एकदा जिंकलं मनं…सामना जिंकल्यानंतर रघुचे धरले पाय! सोशल मिडियावर Video Viral
3

IND vs NZ : सुर्या दादाने आणखी एकदा जिंकलं मनं…सामना जिंकल्यानंतर रघुचे धरले पाय! सोशल मिडियावर Video Viral

WPL 2026 : धक्कादायक… दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! हे संघातील दोन खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर
4

WPL 2026 : धक्कादायक… दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! हे संघातील दोन खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.