मनोज तिवारी आणि महेंद्रसिंग धोनी(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : इंडियन प्रीमअर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि महेंद्रसिंग धोनी हे एक समीकरण झाले आहे. धोनी म्हणजे चेन्नईचा संघ, अशी चाहत्यांची भावना असल्याचे मैदानावरही वारंवार दिसलं आहे. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीची कामगिरी तुलनेने निराशाजनक झाली आहे. त्याच्या या कामगिरीवर एकेकाळी ‘सीएसके’कडून खेळलेला आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने बोचरी टिप्पणी केली आहे. धोनीने यंदाच्या आयपीएलमध्ये चार सामने खेळले असून, केवळ ७६ धावा केल्या आहेत. चाहते आणि क्रिकेट विश्लेषक त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. शनिवारी दिल्लीविरुद्ध धोनी सातव्या क्रमांकावर
फलंदाजीला आला. त्याने २६ चेंडूत केवळ ३० धावा केल्या. शनिवारी सीएसकेला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. मनोज तिवारी हा ‘क्रिकबझ’शी बोलताना म्हणाले की, मला वाटते की त्याच्या
निवृत्तीची योग्य वेळ २०२३ मध्ये होती. कारण त्याने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा त्याने निवृत्त व्हायला हवे होते. मला वाटते की, गेल्या दोन वर्षांत तो ज्या पद्धतीने खेळत आहे यावरुन क्रिकेटमधून त्याने मिळवलेली सर्व प्रसिद्धी, कमावलेले TON नाव आणि आदर कमी होत चालले आहे. आयपीएल क्रिकेट चाहते त्याला अशा प्रकारे खेळताना पाहू शकणार नाहीत. त्याची चमक कमी होत चालली आहे.
मनोज तिवारी म्हणाला. माझ्या मते, संघाच्या हितासाठी एक कठोर निर्णय घ्यावा लागेल.कोणीतरी ते सविस्तरपणे समजावून सांगावे लागेल. मात्र हे जर घडणार नसले तर काही हरकत नाही, आपण ते सोडून देणेच चांगले राहिल.
धोनी १० षटकांपेक्षा जास्त फलंदाजी करू शकत नाही, असे विधान स्टीफन फ्लेमिंग यांनी केले होते. यावर बोलताना मनोज तिवारी म्हणाला की, माजी क्रिकेटपटूचा असा विश्वास आहे की, निर्णय संघाच्या हितासाठी घेतले जात नाहीत. कोणीतरी पुढे येऊन व्यवस्थापनाला प्रयोग थांबवण्यास सांगावे लागेल
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात धोनीची संथ फलंदाजी बघून सर्वच जन निराश झाल्याचे दिसले. त्यामुळे चेन्नईला आपल्याच घरच्या मैदनावर पराभवाला सामोरे जावे लागले. या सर्व प्रकारानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचन पॅनलमध्ये बसलेल्या नवज्योत सिंग सिद्धूने धोनीच्या फलंदाजीवर टीका केली. नवज्योतसिंग सिद्धूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या फलंदाजीवर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, ‘जिंकण्याआधी जिंकण्याचा इरादा असायला हवा. आम्हाला षटकात १७ धावा करायच्या आहेत, पण असे असून देखील तुम्ही एकेरी धावा घेत आहेत. यामुळे संघाचे काही चांगले होणार नाही. धोनी इथून जिंकण्याचा विचार करत असेल, असे मला दिसत नाहीये.’