LSG VS MI : लाईव्ह मॅचमध्ये दिग्वेश राठीची पुन्हा वादग्रस्त कृती, BCCI चा दणका!(फोटो-सोशल मीडिया)
LSG VS MI : काल शुक्रावार (4 एप्रिल) रोजी इकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला गेला. एलसजीने प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर 204 लक्ष्य ठेवले होते. प्रतिउत्तरात लक्ष्याचा पाठलाग करत असताना मुंबई 5 गडी गमावून 191 धावांपर्यंतच मजल मारू शकली. लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला 12 धावांनी पराभूत केले. या विजयासह एलएसजीने या हंगामातील दूसऱ्या विजयाला गवसणी घातली. तर मुंबईला मात्र आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्या दरम्यान काही घटना घडल्या आहेत. त्याबद्दल आपण माहिती घेऊया.
लखनौ सुपर जायंट्स कर्णधार ऋषभ पंत आणि युवा गोलंदाज दिग्वेश सिंग यांनी आयपीएल नियमांचे उल्लंघन केले आहे. दिग्वेश सिंग हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. त्यामुळे आता ऋषभ पंत आणि दिग्वेश सिंग यांना बीसीसीआयकडून दंड ठोठावण्यात आला आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शुक्रवारी एकना क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव झाला. या सामन्यादरम्यान संघाने निर्धारित केलेल्या वेळेत षटके पूर्ण टाकली नाहीत. त्यामुळे ऋषभ पंतला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नियमानुसार संघाला वेळेवर षटके पूर्ण करावी लागतात. आयपीएलकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला आयपीएल 2025 च्या 16 क्रमांकाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोणत्याही गोलंदाजी संघाला 20 षटके पूर्ण करण्यासाठी निर्धारित वेळ 90 मिनिटे आहे. लखनौचा संघ निर्धारित वेळेपासून एक षटक मागे धावत होता. यामुळे त्याला शेवटच्या षटकात ३० यार्डच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक कमी ठेवणे भाग पडले.
हेही वाचा : Sara Tendulkar ची क्रिकेटमध्ये धमकेदार एण्ट्री! जीईपीएलमध्ये बनली ‘या’ संघाची मालकीण..
लखनौ सुपर जायंट्सचा 23 वर्षीय लेगस्पिनर दिग्वेश सिंग पुन्हा वादात आला आहे. त्याला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याला मॅच फीच्या 50 टक्के रक्कम भरावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. सदर दंड हा आयपीएलच्या नियम २.५ चे उल्लंघन करणारा असभ्य भाषा वापरल्याबद्दलचा आहे. तो कलम राठीला लावण्यात आला आहे. झाले असे की, मुंबई इंडियन्सचा फलंदाज नमन धीरला बाद केल्यानंतर दिग्वेश राठीने पुन्हा नोटबुक स्टाईलमध्ये विकेट घेतल्याचा आनंद साजरा केला. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, ‘या मोसमातील आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत हा त्याचा हा दुसरा गुन्हा होता आणि यासाठी त्याच्या खात्यात आणखी एक डिमेरिट पॉइंट जमा झाला आहे.
हेही वाचा : PAK vs NZ : न्यूझीलंडला मोठा धक्का! पाकविरुद्धच्या वनडे मालिकेतून बडा खेळाडू बाहेर
या हंगामात दिग्वेश सिंग हा दुसऱ्यांदा वादात सापडला आहे. याआधी त्याला 1 एप्रिलला पंजाब किंग्जविरुद्धही इशारा देण्यात आला होता आणि आता त्याच्या नावावर एकूण तीन डिमेरिट गुण जमा झाले आहेत. आयपीएलनुसार, या स्तरावरील बाबी सामनाधिकारी ठरवतात आणि त्याचा निर्णय अंतिम मानला जात असतो.