युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma divorce case : भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या अनुभवी लेग-स्पिनर युजवेंद्र चहल आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. युजवेंद्र चहल आणि त्याची माजी पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा सुरू असतात. यावेळी, युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे. जी आता खूप व्हायरल होत आहे. त्याने स्टोरीवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा स्क्रीनशॉट पोस्ट केल असून ज्यामध्ये असे म्हटले होते की, “आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र पत्नी त्यांच्या पतींकडून पोटगी मागू शकत नाहीत.” चहलने आता ही पोस्ट शेअर केली असून त्यावर एक दिले की, “आई, शपथ घे तू या निर्णयापासून मागे हटणार नाहीस.” तथापि, त्याने काही वेळातच त्याची इंस्टाग्राम पोस्ट डिलीट केली आहे. तोपर्यंत, त्याची पोस्ट व्हायरल होऊन आता चर्चेचा विषय झाली आहे.
यजर आता व्हायरल पोस्टला युजवेंद्र चहलच्या माजी पत्नीधनश्री वर्माशी जोडताना दिसत आहेत. चहल आणि धनश्रीचा अलिकडेच घटस्फोट झाला असून मीडिया रिपोर्ट्सनुसार, चहलला ४ कोटी रुपयांची (अंदाजे १.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) मोठी रक्कम भरावी लागली आहे. लोकांना वाटते की कदाचित याच कारणामुळे चहलकरून या पोस्टद्वारे धनश्री वर्मावर टीका करण्यात आली आहे. तथापि, दोघांपैकी कुणाकडूनही या रकमेची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.
भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी २०२० मध्ये विवाह केला होता. २२ डिसेंबर २०२० रोजी मानेसर येथील कर्मा लेक हॉटेलमध्ये या जोडप्याने सात फेरे घेतले होते. तथापि, नशिबाच्या मनात वेगळेच होते. परंतु, त्यांचे नात्यात लवकरच दुरावा आला आणि २० फेब्रुवारी २०२५ रोजी ते दोघे वेगळे झाले. सध्या, दोघेही एकटे राहतात.
Instagram story of Yuzvendra Chahal pic.twitter.com/ERwxRWGtIz — ︎ ︎venom (@venom1s) October 23, 2025
२३ ऑक्टोबर रोजी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा डकवर्थ-लुईस (डीएलएस) नियमानुसार न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला. या विजयासह, भारत बाद फेरीत पोहोचणारा चौथा आणि अंतिम संघ ठरला आहे. भारताने नाणेफेक गमावून ३ बाद ३४० धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात न्यूझीलंड महिला संघाला ४४ षटकांत आठ बाद २७१ धावाच करता आल्या.






