Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs MI : ‘या खेळीबद्दल आठवण नको..’, स्फोटक खेळीने दिल्ली गाजवणाऱ्या करुण नायरकडून नाराजीची आर्त हाक…   

आयपीएल २०२५ च्या २९ व्या सामन्यात दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यात दिल्लीकडून करुण नायरने दमदार खेळी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 14, 2025 | 03:15 PM
DC vs MI: 'Don't remember this innings..', Karun Nair, who made Delhi proud with his explosive innings, expressed his displeasure...

DC vs MI: 'Don't remember this innings..', Karun Nair, who made Delhi proud with his explosive innings, expressed his displeasure...

Follow Us
Close
Follow Us:

DC vs MI : आयपीएल २०२५ चा १८ हंगामातील २९ वा सामना काल दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत मुंबईने २०५ धावा उभारल्या होत्या. प्रतिउत्तरात दिल्ली १९३ धावाच करू शकला. या सामन्यात दिल्लीकडून करुण नायरने दिल्लीच्या विजय मिळवण्याच्या आशा पल्लवित केल्या होत्या. टो खेळ होता तोपर्यंत असे वाटत होते की, दिल्ली सामना सहज जिंकेल परंतु सॅटनरने त्याची विकेट काढली आणि सामना फिरला. नायरने ४० चेंडूत ८९ धावा केल्या. यामध्ये त्याने १२ चौकार आणि ५ षटकार लगावले.  दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला आणि त्याची खेळी व्यर्थ गेली. मुंबई इंडियन्सने हा सामना १२ धावांनी आपल्या खिशात घातला.

हे वर्ष करुण नायरसाठी खूप चांगले जात असल्याचे दिसून येत आहे. करुणने प्रथम रणजी ट्रॉफीमध्ये, नंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खोऱ्याने  धावा केल्या आणि आता त्याने आयपीएलमध्ये मिळालेल्या संधीचा चांगला  फायदा घेत दमदार खेळी केली. आयपीएलमध्ये पुनरागमन करणारा करुण नायर आपला पहिला सामना खेळण्यासाठी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सज्ज होता तसेच त्याला कशा पद्धतीने खेळायचे आहे, ही चांगले माहिती होते.

हेही वाचा : DC Vs MI : अक्षर पटेलला दुहेरी दणका! आधी एमआयकडून पराभव, नंतर BCCI ने फटकारले, डिसीच्या कप्तानाची बिकट स्थिती..

करुण नायरचे बूमराहला आव्हान

मुंबईने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या करुण नायरने जसप्रीत बुमराहला आव्हान दिले होते. त्याने बुमराहच्या  ९ चेंडूत २६ धावा कुटल्या. जसप्रीत बुमराहला एकाच षटकामध्ये दोन षटकार लगावण्याची क्षमता फार कमी फलंदाजांकडे असते, पण करुणने ते सुद्धा या सामन्यात करुन दाखवले आहे. त्याची कामगिरी त्याच्या प्रभावी स्थानिक फॉर्ममुळे देखील बघण्यास मिळाली.  ज्यामध्ये त्याने गेल्या हंगामात विदर्भासाठी सर्व फॉरमॅटमध्ये १८७० धावा चोपल्या होत्या.

मी संधीची वाट पाहत होतो : नायर

भारताकडून कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावणाऱ्या करुणने सामन्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. खरे सांगायचे तर, मी यापूर्वी आयपीएल खेळलो असल्याने मला आत्मविश्वास होता. मला कसे खेळायचे हे देखील माहित होते. माझ्यासाठी ते काही नवीन असे नव्हते. माझ्या मनात सगळी तयारी झाली होती. मी फक्त संधीची वाट पाहत आहे. काही चेंडू खेळून पुन्हा लयीत येण्याची गरज होती.

हेही वाचा : Sourav Ganguly : भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’वर आयसीसीची मोठी जबाबदारी, जय शाहकडून सौरव गांगुलीला पुन्हा पसंती..

चांगले खेळलो पण..

करुण नायरने पॉवरप्ले दरम्यान पारंपारिक शॉट्स खेळण्याबद्दल बोलताना सांगितले की, २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सचा एक  भाग असलेला करुण म्हणाला की, ‘मी स्वतःला सांगत होतो की स्वतःला वेळ दे, सामान्य शॉट्स खेळ आणि त्यानंतर तुम्ही वेगाने खेळू शकता. सगळं तसंच घडत गेलं पण जर संघ जिंकला असता तर नक्कीच जास्त आनंद झाला असता. आता त्याला काही अर्थ नाही. मी चांगला खेळलो पण मी ते पूर्ण करू शकलो नाही.’

Web Title: Dont forget about this innings karun nair expresses displeasure after a strong innings dc vs mi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • Axar Patel
  • DC Vs MI
  • Hardik Pandya
  • Karun Nair
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 
1

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
2

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
3

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?
4

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.