सौरव गांगुली(फोटो-सोशल मीडिया)
Sourav Ganguly : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता एका कारणाने चर्चेत आला आहे. आयसीसीकडून भारतीय क्रिकेटच्या दादावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयसीसीने भाराताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीची पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. माजी भारतीय फलंदाज आणि त्याचा सहकारी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची देखील समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवड करण्यात आली आहे. आयसीसीकडून रविवारी ही माहिती देण्यात आली आहे.
गांगुलीने २००० ते २००५ पर्यंत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. २०२१ मध्ये त्यांना पहिल्यांदाच या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यानंतर त्याने अनिल कुंबळेची जागा घेतली होती. अनिल कुंबळे यांनी तीन वेळा हे पद भूषवले आहे. अनिल कुंबळे एकूण ९ वर्षे त्या समितीवर राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी हे पद सोडले. नियमानुसार आयसीसीमध्ये कोणत्याही पदावर फक्त तीन वेळा राहू शकतो.
गांगुली आणि लक्ष्मण यांच्याव्यतिरिक्त, अफगाणिस्तानचा माजी खेळाडू हमीद हसन, वेस्ट इंडिजचा महान फलंदाज डेसमंड हेन्स, दक्षिण आफ्रिकेचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार टेम्बा बावुमा आणि इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट यांचा देखील या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीकडून महिला क्रिकेटसाठी एक नवीन समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये न्यूझीलंडची माजी ऑफस्पिनर कॅथरीन कॅम्पबेल यांना अध्यक्षपद बनवण्यात आले आहे. तिच्यासोबत माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू एव्हरिल फाहे आणि क्रिकेट साउथ आफ्रिकेचे (सीएसए) फोलेत्सी मोसेकी असणार आहेत.
हेही वाचा : IPL 2025 : RCB च्या ड्रेसिंग रूममध्ये चोरी, Virat Kohli ची खास वस्तु चोरीला, अखेर चोर पकडला.., पहा व्हिडिओ
सौरव गांगुलीची क्रिकेट कारकीर्द यशस्वी राहिली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा समावेश आहे. गांगुलीने त्याच्या कारकिर्दीत ४८८ डावांमध्ये ४१.४६ च्या सरासरीने १८,५७५ धावा केल्याआहेत. ज्यामध्ये ३८ शतके आणि १०७ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ११३ कसोटी सामन्यांमध्ये ५२.५३ च्या सरासरीने ३२ विकेट्स आणि ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८.४९ च्या सरासरीने १०० विकेट्स घेतल्या आहेत. गांगुली हा एक यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार म्हणून देखील ओळखला जातो. त्याने ४९ पैकी २१ कसोटी सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे.