डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशीप दिल्लीत होणार (फोटो- सोशल मिडिया)
या ऐतिहासिक क्लब मध्ये १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान पार पडणाऱ्या डीपी वर्ल्ड इंडिया गोल्फ चॅम्पियनशीप स्पर्धेत जगभरातील अनेक स्टार गोल्फपटूंनी आपला सहभाग निश्चित केला असून डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो या संकेत स्थळावर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची तिकीट विक्री सुरु झाली आहे.
Chess Tournament : निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत तामोजी चक्रवर्ती, अमृता लाड प्रथम
जगातील सर्वोत्तम खेळाडू रोरी मॅकएलरॉय आणि गतविजेत्या टॉमी फ्लीटवूडसह जगातील विविध स्पर्धांमधील विजेते खेळाडू विक्रमी पारितोषिक रकमेसाठी आपले कौशल्य पणाला लावणार असून त्यामुळे स्पर्धेच्या आकर्षणात भर पडली आहे. आतापर्यंत भारतात आणि आशियात झालेल्या गोल्फ स्पर्धांमध्ये एकत्र आलेला सर्वोत्कृष्ट तारांकित खेळाडूंचा संच या स्पर्धेत पाहावयास मिळणार असून, २०२५च्या स्पर्धेत खेळलेल्या अनेक खेळाडूंसोबत जगभरातील विविध मेजर स्पर्धांचे विजेते एरॉन राय, रयान फॉक्स, स्पॅट्रिक रीड आणि जस्टिन रोझ यांच्या सहभागामुळे या स्पर्धेला आगळी प्रतिष्ठा लाभली आहे.
या स्पर्धेच्या मानांकन यादीत रोरी मॅकएलरॉय व स्पॅट्रिक रीड या माजी मास्टर्स विजेत्यांसह विद्यमान ओपन विजेता रयान फॉक्स, तसेच पीजीए चॅम्पियनशिप विजेता एरॉन राय आणि माजी यूएस ओपन विजेता व ऑलिम्पिक विजेता जस्टिन रोझ यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे.
जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद
गोल्फच्या इतिहासांतील सर्व मेजर स्पर्धा जिंकून करिअर स्लॅम पटकावणारा जगभरातील इतिहासातील केवळ सहावा खेळाडू रोरी मॅकएलरॉय याला अग्रमानांकन देण्यात आले असून, त्या पाठोपाठ गतविजेता फ्लीटवूड, माजी ओपन विजेता स्टेन लॉरी, माजी फेडेक्स कप विजेता व्हिक्टर हॉगलँड तसेच, युरोपियन रायडर कप कर्णधार आणि माजी अव्वल मानांकित ल्युक डोनाल्ड यांनी मानांकन यादीत स्थान मिळवले आहे.






