समर्थ जाधवचे शतक
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात समर्थ जाधवने अष्टपैलू कामगिरी करत पूना क्लबच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आक्रमक फलंदाजी करत
प्रथम फलंदाजी करताना पूना क्लबने ५० षटकांत ९ गडी गमावून २३१ धावा उभारल्या. समर्थ जाधवने अवघ्या १०० चेंडूंत १२३ धावा करताना १६ चौकार आणि ३ षटकार लगावले. ऋषिकेशने ११७ चेंडूंत ५४ धावांची संयमी खेळी करत त्याला चांगली साथ दिली. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार मारले. विहान ताकवलेने १५ धावांचे योगदान दिले.आर्यन्स क्रिकेट अकादमीकडून अरिहंतने ३८ धावांत ३ गडी, तर राजवीर होले आणि अर्णव आगासे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा
विजयासाठी २३२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आर्यन्स क्रिकेट अकादमीचा डाव ३८.५ षटकांत १२७ धावांवर आटोपला. सिद्ध राठोडने ८९ चेंडूंत ७६ धावांची झुंजार खेळी केली. त्याच्या खेळीत १४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. अर्णव आगासेने १० धावा केल्या.पूना क्लबकडून समर्थ जाधवने १५ धावांत ३ गडी, तर तुषार बांगर आणि स्वराज बनसोडे यांनी अनुक्रमे २-१९ आणि २-९ अशी गोलंदाजी केली. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या समर्थ जाधवची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
दुसऱ्या सामन्यात कृष्णा राऊतच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर सार्क क्रिकेट अकादमीने द क्रिकेट क्लब ऑफ रोहित संघाचा ९० धावांनी पराभव केला. कृष्णा राऊतने अवघ्या ९ धावांत ४ गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. प्रथम फलंदाजी करताना सार्क क्रिकेट अकादमीने ४४.५ षटकांत सर्वबाद २२२ धावा केल्या. अवधूत कानडेने आक्रमक फलंदाजी करत ६१ चेंडूंत ७० धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि ३ षटकार फटकावले. शिवराज नागवडेने ६२ चेंडूंत ३८ धावा करताना ५ चौकार मारले. अनिमेश दासने २३, तर आरुष पवारने नाबाद १४ धावा केल्या.
DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
द क्रिकेट क्लब ऑफ रोहितकडून अथर्व बाडेने ३६ धावांत ३ गडी, तर ऋग्वेद काळेने ३९ धावांत २ गडी बाद केले.विजयासाठी २२३ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या द क्रिकेट क्लब ऑफ रोहितचा डाव ४२.२ षटकांत १३२ धावांवर संपुष्टात आला. सागर पाबळेने १३४ चेंडूंत ७९ धावांची झुंजार खेळी करत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. त्याने १२ चौकार लगावले. रितम सेनने १७ धावा केल्या.मात्र, सार्क क्रिकेट अकादमीच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. कृष्णा राऊतने अवघ्या ९ धावांत ४ गडी बाद केले, तर शिवराज नागवडेने ३० धावांत ३ गडी टिपले. कृष्णा राऊतच्या भेदक गोलंदाजीमुळे सार्क क्रिकेट अकादमीने सामना ९० धावांनी जिंकला. त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.






