फोटो सौजन्य - England Cricket सोशल मीडिया
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. T२० विश्वचषकाच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे फार काही चांगले दिवस सुरु नाही. बांग्लादेशचा संघ भारतामध्ये येण्याआधी त्यांनी पाकिस्तानला पराभूत केलं होतं. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. यामध्ये पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता परंतु तो निर्णय त्यांनाच महागात पडला. आता इंग्लड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन कसोटी सामन्याची मालिका आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पहिला सामना पार पडला आहे. पाकिस्तानच्या संघाला त्याच्या घरच्या मैदानावर इंग्लंडने ४७ धावांनी पराभूत केलं आहे.
पाकिस्तानच्या संघाने फलंदाजी करत पहिल्या इनिंगमध्ये ५५६ धावा केल्या. यामध्ये पाकिस्तानच्या संघाने कमालीची कामगिरी करत अब्दुल्ला शफीकने संघासाठी शतक ठोकलं. त्यानंतर शान मसूदने संघासाठी १७७ चेंडूंमध्ये १५१ धावा केल्या. सलमान अली अघाने सुद्धा संघासाठी शतक ठोकलं. सौद शकीलने सुद्धा संघासाठी ८२ धावांची खेळी खेळली. अवधी मोठी धावसंख्या उभी करूनही पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला त्याचे कारण म्हणजेच त्यांची गोलंदाजी.
Magic in Multan! 🙌
A famous, famous win! 🦁
Match Centre: https://t.co/M5mJLlHALN
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/lKM6NWzH2A
— England Cricket (@englandcricket) October 11, 2024
इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना त्यांच्याच मैदानावर धूळ चारली. इंग्लंडने पहिल्याच सामन्यात पहिल्याच इनिंगमध्ये पाकिस्तानचा गेम ओव्हर केला. झॅक क्रॉलीने संघाला दमदार सुरुवात करून देत ८५ चेंडूंमध्ये ७८ धावा केल्या. कॅप्टन ओली पोपे शून्यावर आऊट झाला परंतु जोई रूटने संघाचा खेळ संभाळला आणि संघासाठी ३७५ चेंडूंमध्ये २६२ धावा केल्या. बेन डकेटने सुद्धा संघासाठी चांगली कामगिरी केली. इंग्लंडच्या संघाचा इक्का ठरला तो म्हणजेच हॅरी ब्रूक. हॅरी ब्रूकचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी त्याने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि पाकिस्तनाच्या फलंदाजांचा घाम गाळला. हॅरी ब्रूकने संघासाठी ३२२ चेंडूंमध्ये ३१७ धावांची खेळी खेळली. या फलंदाजाच्या जोरावर पहिल्याच इनिंगमध्ये इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानविरुद्ध ८२३ धावांची खेळी खेळली आणि इंग्लंडच्या संघाला दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करण्याची गरजही लागली नाही.