इंग्लंड कसोटी संघ(फोटो-सोशल मीडिया)
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२५-२६ अॅशेससाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बेन स्टोक्स संघाची धुरा सांभाळणार असून हॅरी ब्रूकची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.
अॅशेस मालिकेसाठी १६ सदस्यीय संघामध्ये मॅथ्यू पॉट्स आणि विल जॅक्स यांना संघात स्थान देण्यात आले आहे. जॅक्स सध्या बोटाच्या दुखापतीतून जात आहे. परंतु, ईसीबीला त्याच्याबद्दल विश्वास आहे की तो अॅशेसपूर्वी तंदुरुस्त होईल. जॅक्सने डिसेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळलेला आहे. जॅक्स तीन वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करत आहे. जॅक्स हा उजव्या हाताचा फलंदाज आणि एक मजबूत फिरकी गोलंदाज देखील आहे.
हेही वाचा : Ind vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध जसप्रीत बुमराह दिसणार मैदानात? BCCI कडे स्वतः च केला खुलासा; वाचा सविस्तर
तसेच वेगवान गोलंदाज असणारा मॅथ्यू पॉट्सला संघात स्थान दिले गेले आहे. त्याने डिसेंबर २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडसाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पॉट्सने काउंटी हंगामात आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने डरहमकडून खेळताना १० काउंटी चॅम्पियनशिप सामन्यांमध्ये २८ बळी मिळवले आहेत. डाव्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडला देखील संघात स्थान मिळाले आहे. शोएब बशीर हा फिरकी गोलंदाज देखील संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. त्याला भारताविरुद्ध दुखापत झाली होती.
इंग्लंड संघात कर्णधार बेन स्टोक्स, जो रूट, झॅक क्रॉली, बेन डकेट आणि ऑली पोप या सारख्या अनुभवी फलंदाजांचा भरणा आहे. यष्टीरक्षक जेमी स्मिथ देखील आक्रमक खेळण्यास ओळखला जातो. मार्क वूड आणि मॅथ्यू पॉट्स व्यतिरिक्त, इंग्लंडकडे जोफ्रा आर्चर सारखे गोलंदाज संघात आहेत. ब्रायडन कार्स, गस अॅटकिन्सन आणि जोश टंग हे देखील वेगवान गोलंदाजीला बळकटी देणारे गोलंदाज आहेत. तसेच फिरकी गोलंदाजीत शोएब बशीरला झॅक, रूट आणि जेकब बेथेल यांची साथ मिळेल.
पहिली कसोटी २१ नोव्हेंबरपासून पर्थ, दुसरी कसोटी ४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये, तिसरी कसोटी १७ डिसेंबरपासून अॅडलेडमध्ये, चौथी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये आणि पाचवी कसोटी ४ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवण्यात येणार आहे.
बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), झॅक क्रॉली, जो रूट, जेकब बेथेल, ऑली पोप, बेन डकेट, गस अॅटकिन्सन, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, ब्रायडन कार्स, मॅथ्यू पॉट्स, जोश टंग, मार्क वूड.