अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती(फोटो-सोशल मीडिया)
ICC T20 Rankings : आयसीसीकडून ताजी रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून येत आहे. भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या, रहस्यमय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा हे खेळाडू टी२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहेत.
भारतीय संघातील हे तिन्ही खेळाडू ताज्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहेत. मागील आठवड्यात जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनलेल्या चक्रवर्तीने १४ रेटिंग गुणांची कमाई करून अव्वल स्थान अधिक मजबूत केले आहे. त्याचे गुण आता ७४७ झाले असून जे सलग दुसऱ्या आठवड्यात अव्वल स्थानावर कायम आहे. गेल्या आठवड्यात ११ स्थानांची झेप घेतलेल्या पाकिस्तानच्या अबरार अहमदने ताज्या रँकिंगमध्ये १२ स्थानांनी मोठी झेप घेतली आहे.
हेही वाचा : IND vs BAN : मुस्तफिजूर रहमानला खुणावतोय ‘हा’ विक्रम! भारताविरुद्धच्या सामन्यात रचणार इतिहास
पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमद आता रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. बांगलादेशचा अनुभवी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानल देखील सहा स्थानांचा फायदा होऊन टॉप १० मध्ये दाखल झाला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाजाने आशिया कपमधील शेवटच्या दोन सामन्यामध्ये आठच्या सरासरीने सहा विकेट्स काढल्या आहेत. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या अव्वल स्थानावर आहे, त्याला गोलंदाजांच्या क्रमवारीत सहा स्थानांचा फायदा होऊन तो ६० व्या स्थानावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू मोहम्मद नबी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
भारताचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेकने फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. त्याने ओमानविरुद्ध भारताच्या शेवटच्या गट सामन्यामध्ये जलद ३८ धावा तर रविवारी पाकिस्तानच्या १७१ धावांच्या पाठलाग करताना भारताला जिंकून देणाऱ्या ७४ धावा काढल्या. तसेच पाकिस्तानविरुद्ध १९ चेंडूत नाबाद ३० धावा करून भारताला लक्ष्य गाठण्यात मदत करणारा तिलक वर्माला देखील तीन स्थानांचा फायदा झाला आहे. तर कर्णधार सूर्यकुमार यादव देखील एका स्थानाने पुढे सरकून हिल्या पाचमध्ये स्थान मिळवण्याच्या जवळ जाऊन पोहोचला आहे.
हेही वाचा : Ind vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध जसप्रीत बुमराह दिसणार मैदानात? BCCI कडे स्वतः च केला खुलासा; वाचा सविस्तर
भारताविरुद्ध ४५ चेंडूत ५८ धावांची खेळी करणारा पाकिस्तानचा साहिबजादा फरहान ३१ स्थानांचा फायदा घेऊन २४ व्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच पाकिस्तानच्या हुसेन तलतने पुरुषांच्या टी-२० फलंदाजी क्रमवारीत संयुक्त २३४ व्या स्थानावर मोठी झेप घेतली असून बांगलादेशचा सैफ हसन १३३ स्थानांनी पुढे सरकून ८१ व्या स्थानावर येऊन पोहोचला आहे.