Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026 Final: फुटबॉलची सुंदर कहाणी! ज्याला लहानपणी मिठी मारली, ‘तो खेळाडू फायनलमध्ये मेस्सीला देणार टक्कर

lamine yamal will play against messi 19 years old pic surfaced: फिफा विश्वचषक २०२६च्या अंतिम सामन्यात मेस्सी आणि लॅमिन यामाल आमनेसामने येणार असून, १९ वर्षांपूर्वीच्या एका फोटोमुळे त्यांची अनोखी कहाणी चर्चेत आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 16, 2026 | 03:35 PM
FIFA World Cup 2026 Final: फुटबॉलची सुंदर कहाणी! ज्याला लहानपणी मिठी मारली, ‘तो खेळाडू फायनलमध्ये मेस्सीला देणार टक्कर
Follow Us
Follow Us:
  • फुटबॉलची सुंदर कहाणी
  • १९ वर्षानंतर मेस्सी यामाल आमनेसामने
  • यामालच्या वडिलांनी शेअर केला फोटो
फिफा विश्वचषक २०२६ सध्या अंतिम टप्प्यात आहे. ही संपूर्ण स्पर्धा सामन्यांपेक्षाही वेगवेगळ्या कारणांमुळे जास्त चर्चेत राहिली. फुटबॉल विश्वातील एक असा अविश्वसनीय योगायोग सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. रविवारी, २० जुलै रोजी फिफाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन आमनेसामने येतील, तेव्हा एका बाजूला ३९ वर्षीय लिओनेल मेस्सी आणि दुसऱ्या बाजूला १९ वर्षीय लॅमिन यामाल असेल. त्यांच्या वयात जवळपास दोन दशकांचे अंतर आहे, पण त्यांना जोडणारा दुवा म्हणजे १९ वर्षांपूर्वीचा एक फोटो, ज्याने संपूर्ण जगाला भावूक केले आहे.

IND vs ENG: शुभमन गिलच्या फिटनेसने वाढवली चिंता; संघात होणार मोठे बदल? पाहा पिच रिपोर्ट अन् संभाव्य Playing 11 एका क्लिकवर

मेस्सीने जेव्हा  ५ महिन्यांच्या यामालला घेतले मिठीत

२००७ मध्ये २० वर्षाचा लिओनल मेस्सी स्पॅनिश क्लब बार्सिलोनाकडून खेळत होता. स्पॅनिश वृत्तपत्र ‘डायरिओ स्पोर्ट’ आणि ‘युनिसेफ’साठी एका चॅरिटी कॅलेंडरच्या फोटोशूटकरिता, मेस्सीला एका स्थानिक कुटुंबाच्या पाच महिन्यांच्या बाळासोबत पोज देण्यास सांगितले गेले. त्या बाळाचे नाव होते लामिन यामाल.

फोटोग्राफर जोन मॉनफोर्ट यांनी मेस्सीचे यामालसोबत एका निळ्या प्लास्टिकच्या टबमध्ये बसलेले अनेक फोटो काढले. दरम्यान, निरागस यामालला याची अजिबात कल्पना नव्हती की, ज्या माणसाने त्याला धरले होते, तो पुढे जाऊन फुटबॉलच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक बनेल. शिवाय मेस्सीलाही कधी वाटले नसेल की, हा मुलगा एक दिवस विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भिडेल. आज हा हा फोटो विश्वचषक अंतिम सामन्याआधीची सर्वात मोठी बातमी आहे.

 

यामालच्या वडिलांनी शेअर केला फोटो

फोटोशूटनंतर, हे फोटो अनेक वर्षे लोकांच्या नजरेपासून दूर होते. मग, २०२४ मध्ये, लामिन यामालच्या वडिलांनी ते सोशल मीडियावर शेअर केले. तो फोटो जगभरात त्वरित व्हायरल झाला. लोकांना कळले की मेस्सीच्या कुशीत बसलेला तोच मुलगा आता बार्सिलोना आणि स्पेनचा नवीन स्टार बनला आहे. आज, हा फोटो फुटबॉलच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चित फोटोपैकी एक मानला जातो.

 

१९ वर्षानंतर नियतीने पुन्हा एकदा आणले समोरासमोर

फुटबॉलमध्ये, पेले आणि मॅराडोना कधीही एकमेकांसमोर आले नाहीत. मॅराडोना आणि मेस्सीसुद्धा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कधीही एकमेकांसमोर आले नाहीत, पण यावेळी नशिबाने वेगळीच कहाणी रचली आहे. ज्या लहान मुलाला मेस्सीने एके काळी आपल्या कुशीत घेतले होते, तोच आता विश्वचषक अंतिम सामन्यात त्याच्यासमोर उभा राहील. एका बाजूला मेस्सी आहे, तर दुसऱ्या बाजूला यामाल आहे. हे दोघेही अंतिम सामन्यात भिडणार आहेत. त्यामुळे हा सामना अधिक रोमांचक होण्याती शक्यता आहे.

लॅमिन यामालने अगदी लहान वयात स्पेन आणि बार्सिलोनासाठी असंख्य विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याचे ड्रिब्लिंग, खेळ ओळखण्याची क्षमता आणि आत्मविश्वास यांमुळे तो जगातील सर्वात प्रतिभावान तरुण खेळाडूंपैकी एक बनला आहे. दुसरीकडे, मेस्सीने वयाच्या ३९ व्या वर्षीही अनेक रेकॉर्ड्स मोडले इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, त्याने दोन उत्कृष्ट असिस्ट देऊन अर्जेंटिनाला २-१ असा विजय मिळवून दिला आणि सलग तिसऱ्यांदा विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत केली. मेस्सीने या विश्वचषकात सात सामन्यांमध्ये आठ गोल आणि चार असिस्ट केले आहेत. तो गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर असून, ३३ सामन्यांमध्ये २१ गोल ​​आणि १२ असिस्टसह विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

IND vs ENG: भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?

Web Title: Fifa world cup 2026 final messi vs lamine yamal 19 year old photo story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • Lionel Messi
  • viral video

संबंधित बातम्या

भयंकर युद्ध पेटणार? इंग्लंडची हार अन् अर्जेंटिनाने उकरून काढला रक्तरंजित इतिहास; FIFA कारवाई करणार
1

भयंकर युद्ध पेटणार? इंग्लंडची हार अन् अर्जेंटिनाने उकरून काढला रक्तरंजित इतिहास; FIFA कारवाई करणार

लज्जास्पद! भर वर्गात शिक्षिकेसोबत रोमान्स गुरुजींना पडला महागात; संशय आल्याने पत्नीने गुपचुप व्हिडिओ रेकॉर्ड केला अन्…
2

लज्जास्पद! भर वर्गात शिक्षिकेसोबत रोमान्स गुरुजींना पडला महागात; संशय आल्याने पत्नीने गुपचुप व्हिडिओ रेकॉर्ड केला अन्…

Argentina vs England: 84 मिनिटानंतर अर्जेंटिनाचा कमबॅक, इंग्लंडला नमवत फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक
3

Argentina vs England: 84 मिनिटानंतर अर्जेंटिनाचा कमबॅक, इंग्लंडला नमवत फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक

गेम लयं मोठा हाय गड्या! खेळ फुटबॉलचा, पाऊस पैशांचा; FiFa World च्या बक्षिसाची रक्कम वाचून व्हाल थक्क
4

गेम लयं मोठा हाय गड्या! खेळ फुटबॉलचा, पाऊस पैशांचा; FiFa World च्या बक्षिसाची रक्कम वाचून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.