शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मालिका नावावर करण्यासाठी मैदानात उतरेल. मालिकेतील हा सामना कार्डिफमध्ये खेळला जाईल. या सामन्याची वेळ मागील सामन्यापेक्षा बदलली आहे. दरम्यान, आजचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५:३० वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी, म्हणजेच सायंकाळी ५ वाजता होईल. यापूर्वीचा पहिला सामना दुपारी ३:३० वाजता सुरू झाला होता.
टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना सहा विकेट्सने जिंकला टी- २० मालिका ४- ० ने गमावूनही, त्यांनी या मालिकेत जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे, संघ आज मोठ्या उत्साहाने मैदानात उतरेल आणि मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे. परंतु, मागील सामन्यात स्वस्तात बाद झालेले रोहित शर्मा आणि विराट कोहली आजच्या सामन्यात कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कोहलीने आतापर्यंत इंग्लंडमध्ये २६४२ धावा केल्या आहेत. जर त्याने आणखी चार धावा केल्या, तर तो राहुल द्रविडला मागे टाकेल. त्यामुले कोहली आणखी एक नवीन विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. राहुल द्रविडने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडमध्ये खेळताना २६४५ धावा केल्या आहेत.
भारतीय संघ: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.
इंग्लंड संघ: बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग, ब्रायडन कार्स, साकिब महमूद, टॉम बँटन, गेस ऍटकिन्सन, जेम्स कोल्स, रेहान अहमद.
क्रिकेटविश्वात खळबळ! शाहिद आफ्रिदी-शोएब अख्तरने भारतात ड्रग्स पुरवले? RVS मणी यांचा गंभीर आरोप






