कतार – फीफा वर्ल्ड कप 2022 चा विश्वविजेता लवकरच मिळणार आहे. कारण आता फक्त फुटबॉल विश्वविजेता ठरण्यासाठी काही तास बाकी राहिले आहेत. दरम्यान, आज अर्जेंटिना Vs क्रोएशिया तर उद्या फ्रान्स Vs मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. आज रात्री 12.30 वाजता अर्जेंटिना-क्रोएिशया, तर उद्या 14 डिसेंबरच्या रात्री फ्रान्स-मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीतील सामना होईल. यांच्यातील दोन विजयी संघ अंतिम सामन्यात भिडतील. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात बलाढ्य पोर्तुगील व ब्राझील या संघाना बाहेर पडावे लागले आहे. आणि प्रथमच मोरोक्को हा संघ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहचला आहे. 18 डिसेंबरला अंतिम सामना होईल. त्यामुळं नवा विश्वविजेता कोण ठरणार याची उत्सुकता जगभरातील फुटबॉलप्रेमीना लागली आहे.
दरम्यान, प्रथमच गतविजेता (फ्रान्स) व गतउपविजेता (क्रोएशिया) संघांचा उपांत्य फेरीत मुकाबला होईल. कमकुवत समजल्या जाणाऱ्या मोरोक्कोविरुद्ध एकही संघ गोल करू शकला नाही. त्यांच्याविरुद्ध त्यांच्याच खेळाडूकडून एक गोल झाला होता. क्रोएशियाही अद्याप हरलेला नाही. त्यामुळे फ्रान्स, अर्जेंटिनाचा मार्ग खडतर आहे. तर दुसरीकडे आजच्या सामन्यात प्रसिद्ध खेळाडू लिओनेल मेस्सीच्या खेळीकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विश्वचषक स्पर्धेस प्रारंभ झाला. 24 दिवस झाले असून एकूण 32 संघांमध्ये 60 सामने झाले. आता 4 संघ रिंगणात उरले आहेत.
आज रात्री 12.30 वाजता अर्जेंटिना-क्रोएिशया यांच्यात सामना होईल, क्रोएिशया यांच्या तुलनेता अर्जेटिनाचा संघ तुल्यबळ व सरस वाटतो. कारण या संघात जगप्रसिद्ध खेळाडू मेस्सी असल्यामुळं या संघाचे पारडे जड वाटते. तर उद्या 14 डिसेंबरच्या रात्री फ्रान्स-मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीतील सामना होईल. यांच्यातील दोन विजयी संघ अंतिम सामन्यात भिडतील. आतापर्यंत सर्वाधिक 159 गोल झालेत. स्पर्धा सुरू झाली तेव्हा ब्राझील 40% सह उपांत्यफेरीचा दावेदार होता. परंतु तो बाहेर गेला.