चेतेश्वर पुजाराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर(फोटो-सोशल मीडिया)
Cheteshwar Pujara’s sister-in-law commits suicide : चेतेश्वर पुजाराच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पूजारचा मेहुणा जीत पाबारी याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा माजी कसोटीपटू चेतेश्वर पुजाराच्या कुटुंबावर या घटनेने मोठा धक्का बसला आहे. पूजाराचा मेहुणा जीत पाबारीने राजकोट येथील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे बोलेले जात आहे. पुजारा भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यावर समालोचन करत असताना ही हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : ऋतुराज गायकवाडने लिहिला इतिहास! CSK च्या कर्णधाराने रेकॉर्ड बुकवर कोरले नाव
जीत पाबारी नोव्हेंबर २०२४ पासून एका गंभीर आरोपामुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्याच्या माजी मंगेतरने त्यांच्याविरुद्ध बलात्कार, मारहाण आणि फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असा आरोप करण्यात आला होता की, जीतने त्यांच्या लग्नानंतर तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर अचानक लग्न मोडून टाकले.
त्यानंतर जीतने दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले होते, ज्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले होते. तक्रारदाराने असा देखील दावा करण्यात आला आहे की, तिला पुजाराच्या नावाचा वापर करून धमक्या देण्यात येत आहेत. या आरोपांमुळे जीत पाबारी मानसिक तणावात होता आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून तो नैराश्यात होता.
वृत्तानुसार, जीत पाबारी राजकोटमध्ये त्यांच्या कुटुंबासोबत राहत होता. घटनेच्या दिवशी त्याने घरी गळफास घेतला. आवाज ऐकून शेजारी घटनास्थळी धावून गेले आणि त्याला रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. तथापि, प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसून येत आहे. पोलिस त्यामागील कारण शोधत असल्याचे म्हटले जात आहे.
चेतेश्वर पुजारा घटनेच्या वेळी दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्याचे टीव्हीवर समालोचन करत होता. त्याला बातमी मिळताच कार्यक्रम सोडून निघून जावे लागले. या दुःखद घटनेमुळे कुटुंबाला चांगलाच धक्का बसला आहे.
पोलिसांकडून सांगण्यात आले की, मानसिक ताण किंवा गेल्या वर्षी दाखल झालेल्या खटल्याचा या कृत्याशी काही संबंध होता का हे तपासात निश्चित केले जाणार आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक डेटा तपासल्यानंतर अधिक माहिती समोर येईल.






