Vinesh Phogat Disqualified Jordan Burroughs Demands Rule Changes : पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत दाखल झालेल्या कुस्तीपटू विनेश फोगटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित आले. विनेश ही ५० किलो वजनी गटात खेळते. मात्र, तिचं वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅमने अधिक भरल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. विनेश ही अंतिम सामन्यात अमेरिकन कुस्तीपटू सारा हिच्याशी दोन हात करणार होती. मात्र विनेशसह संपूर्ण भारताचं पदक विजयाचं स्वप्न भंगलं आहे. दरम्यान, क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत याप्रकरणी सरकारची भूमिका सविस्तरपणे मांडली.
विश्वविजेता ठरलेला मल्ल जॉर्डनची मागणी
BREAKING : 6 Times World Champion and Olympic Gold Medalist Wrestler from USA, Jordan Burroughs comes in support of Vinesh Phogat and demands silver for her.
A foreign athlete is standing with our champion #VineshPhogat but Indian Celebrities and sportspersons have bot spoken a… pic.twitter.com/ngcQih4yHN
— Roshan Rai (@RoshanKrRaii) August 7, 2024
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपतींनी विनेशला दिला धीर
ते म्हणाले की, याप्रकरणी आवश्यक ती सर्व प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विनेशला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विनेश ही एक चॅम्पियन खेळाडू आहे. तर विरोधी पक्षांनी या अपात्रता प्रकरणात कटाचा संशय व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या नियमांमध्ये बदल
विनेशला पदक गमवावं लागल्यामुळे आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली जात आहे. अमेरिकेचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता व सहा वेळा विश्वविजेता ठरलेला मल्ल जॉर्डन बरोज विनेशच्या बाजूने मैदानात उतरला आहे. त्याने जागतिक कुस्ती संघटनेकडे (United World Wrestling) काही नियम बदलण्याची शिफारस केली आहे. तसेच त्याने विनेशला रौप्य पदक देण्याची मागणी देखील केली आहे. जॉर्डनने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत विनेशचं समर्थन केलं आहे.
जॉर्डन बरोजने मांडलेला नियम बदलांचा प्रस्ताव
१. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वजन एक किलोपर्यंत वाढलं तरी त्या कुस्तीपटूला सवलत मिळायला हवी.
२. वजनाची तपासणी सकाळी ८.३० वाजता करण्याऐवजी सकाळी १०.३० वाजता केली जावी.
३. भविष्यात एखादा खेळाडू उपांत्य फेरीत जिंकल्यानंतर अंतिम फेरीपूर्वी वजन नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरला तर त्याला पराभूत घोषित करावं.
४. उपांत्य फेरीत जिंकलेल्या दोन्ही खेळाडूंचं पदक सुरक्षित असावं. दुसऱ्या दिवशी त्यांच्यापैकी कोणाचंही वजन वाढलं तर ज्याने आपलं वजन नियंत्रणात ठेवलंय त्याला सुवर्ण तर दुसऱ्या मल्लाला पराभूत घोषित करून रौप्य पदक दिलं जावं.
५. विनेशला रौप्य पदक दिलं जावं.
ऑलम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटचा पहिला फोटो समोर
ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेल्या कुस्तीपटू विनेश फोगटचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत तिचा चेहरा हसरा दिसत असला तरी तिच्या हास्यामागे दडलेलं दुःख व यातना स्पष्ट दिसत आहेत. या फोटोत भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या (IOA) अध्यक्षा पी. टी. उषा या विनेशला धीर देताना दिसत आहेत. ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी स्पर्धेतून अपात्र ठरल्यानंतर विनेश मानसिकरित्या कोलमडली होती. त्यानंतर तिच्यावर उपचार चालू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. मात्र ती मानसिकरित्या खूपच निराश आहे.