फोटो सौजन्य - Gujarat Titans सोशल मीडिया
गुजरात विरुद्ध हैदराबाद सामन्याचा अहवाल : अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज गुजरात टायटन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पार पडला. या सामन्यात हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात टायटन्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादला अहमदाबादमध्ये 38 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात शुभमन गिल त्याचबरोबर जोस बटलर आणि साई सुदर्शन यांच्या कमालीच्या खेळीने संघाला विजयी मिळवण्यात मोलाचे योगदान दिले. हैदराबादच्या संघाचा हा सातवा पराभव आहे. आजच्या सामन्यात अभिषेक शर्माने संघासाठी चांगली खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही.
हैदराबादच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर ट्रॅव्हिस हेडने १६ चेंडूंमध्ये २० धावा केल्या. आजही तो संघासाठी मोठी खेळी खेळू शकला नाही. आजच्या सामन्यात अभिषेक शर्माने मोठी खेळी खेळली. या सामन्यात अभिषेक शर्माने ४१ चेंडूंमध्ये ७४ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ षटकार आणि ४ चौकार मारले. ईशान किशन आणखी एकदा फेल ठरला. त्याने आज १७ चेंडू खेळले यामध्ये तो फक्त १३ धावा करू शकल्या. हेनरिक क्लासेन देखील आज संघासाठी विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने आज संघासाठी १८ चेंडूंमध्ये २३ धावा केल्या आहेत. पॅट कमिन्सने आज संघासाठी चांगली खेळी खेळली त्याने १० चेंडूंमध्ये १९ धावा केल्या आणि नाबाद राहिला.
Match 51. Gujarat Titans Won by 38 Run(s) https://t.co/u5fH4jPU3a #GTvSRH #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2025
गुजरातच्या गोलंदाजीचे सांगायचे झाले तर मोहम्मद सिराजने आज संघासाठी २ विकेट्सची कमाई केली. यामध्ये त्याने अनिकेत वर्मा आणि कमिंडू मेंडिस या दोघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. प्रसिद्ध कृष्णा याने आज संघासाठी २ विकेट्स घेतले यासह त्याने आता पर्पल कॅपवर देखील कब्जा केला आहे. आजच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णा याने ट्रॅव्हिस हेड आणि हेनरीक क्लासेन या दोघांना आऊट करून संघाला महत्वाचे विकेट मिळवून दिले. जेराल्ड कोएत्झी आणि इशांत शर्मा या दोघांनी आज प्रत्येकी १ विकेट घेतला.
शुभमन आऊट की नॉट आऊट? गुजरातच्या कर्णधाराचा विकेट वादग्रस्त! कॅप्टन संतापला, पहा Video
२ एप्रिल रोजी शुक्रवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल टी-२० सामन्यात गुजरात टायटन्सने पहिले फलंदाजी आव्हान स्वीकारत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ६ विकेटच्या मोबदल्यात २२४ धावा केल्या. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने ७६ धावा, जोस बटलरने ६४ धावा आणि सलामीवीर साई सुदर्शनने ४८ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून जयदेव उनाडकटने ३, तर पॅट कमिन्स आणि झीशान अन्सारी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
या विजयासह गुजरात टायटन्सचा संघ पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. संघाचे सध्या १४ गुण आहेत. तर दुसरीकडे हैदराबादचा संघ गुणतालिकेमध्ये नवव्या स्थानावर आहे संघाच्या आशा जवळजवळ नष्ट झाल्या आहेत.