फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया
शुभमन गिलचा वादग्रस्त विकेट : आज गुजरात टायटन्सची फलंदाजी आणखी एकदा प्रभावशाली राहिली. आजच्या सामन्यात आणखी एकदा गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी आश्चर्यकारक फलंदाजी केली आणि सर्वानाच चकित केले. शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी संघाला आज चांगली सुरुवात करून दिली आणि मोठी धावसंख्या उभी करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. आजच्या सामन्यात साई सुदर्शनचा विकेट झिशान अन्सारी याने घेतला. पण सध्या या सामन्याचा हायलाईट म्हणून गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याचा विकेट आहे, नक्की प्रकरण काय आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
सध्या सोशल मीडियावर शुभमनचा विकेट चर्चेत आहे, आज त्याला हर्षल पटेल याने धावबाद केले यावेळी त्याला अंपायरने आऊट दिले आणि त्यानंतर तो पंचावर संतापलेला पाहायला मिळाला आहे. शुभमन गिलने ३८ चेंडूत ७६ धावांची जलद खेळी केली पण तो वादग्रस्त धावबाद झाला. १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही घटना घडली, जेव्हा झीशान अन्सारीने मिडल आणि लेग स्टंप लाईनवर लेंथ बॉल टाकला. क्रीजवर असलेल्या जोस बटलरने तो ऑनसाईडकडे खेळला आणि लगेचच एक धाव घेतली. हर्षल पटेलने चपळाई दाखवत चेंडू पकडला आणि तो किपरच्या टोकावर फेकला.
What’s your take? 👇✍🏻#ShubmanGill seen having a word with the umpire after being given out by the third umpire on a tight call! 👀
Watch the LIVE action ➡ https://t.co/RucOdyBVUf#IPLonJioStar 👉 #GTvSRH | LIVE NOW on SS-1, SS- 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/TPiALXJu8O
— Star Sports (@StarSportsIndia) May 2, 2025
या दरम्यान, प्रकरण खूप जवळचे असल्याने तिसऱ्या पंचांना निर्णय घेण्यासाठी बराच वेळ लागला. रिप्लेमध्ये चेंडू स्टंपवर आदळत असल्याचे दिसून आले, परंतु विकेटकिपरच्या हातमोज्यांमुळे बेल्सही उडत असल्याचे दिसून आले. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनेक वेळा रिप्ले पाहिल्यानंतर, तिसऱ्या पंचांनी शुभमन गिल बाद झाल्याचा निर्णय दिला कारण बेल्स स्टंपवरून व्यवस्थित काढल्या गेल्या होत्या.
Subman gill is seriously not happy with third umpire’s decision,
What do you think, was that really out? 👀#GTvSRH pic.twitter.com/H6QTQsqRGv
— Saanvi (@SaanviMsdian) May 2, 2025
तथापि, शुभमन गिल या निर्णयावर पूर्णपणे नाराज दिसत होता. बाहेर पडल्यानंतर तो रागाने मैदानाबाहेर गेला आणि सामना अधिकाऱ्यांशी बोलतानाही दिसला. गिलच्या शानदार खेळीमुळे संघ मजबूत स्थितीत आला, पण त्याचा रनआउट सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. शुभमन गिलच्या विकेटनंतर गुजरात टायटन्स जोस बटलरने संघासाठी अर्धशतक झळकवले.