Hardik Pandya and son Agast are immersed in devotion : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या नेहमी चर्चेत असतो. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. हार्दिक पंड्या सध्या त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. त्याच वेळी, हार्दिक पंड्या आयपीएलनंतर त्याच्या कुटुंब आणि मुलासोबत अधिकाधिक वेळ घालवत असल्याचे दिसत आहे. या दरम्यान, हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ सद्या व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये तो त्याचा मुलगा अगस्त्यसोबत भजन गाताना दिसत आहे.
हार्दिक आणि त्याचा मुलगा अगस्त्यचा हा व्हिडिओ मोठ्या प्रामान्त व्हायरल होत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असल्याचे दिसुन येत आहे. हार्दिक पंड्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या मुलासोबत ‘महादेव… महादेव…’ चे भजन गात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील पंड्या ब्रदर्सच्या घरी काढण्यात आला होता. जिथे स्टार खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसोबत अशा वातावरणात दिसले आहेत. यावेळी हार्दिकने त्याचा भाऊ कृणाल पंड्याचा मुलगा कबीर याला त्याच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
हेही वाचा : पंड्याचा पुन्हा Heartbreak! आता जास्मिननेही सोडली साथ; दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो..
इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना हार्दिक पंड्याने लिहिले की, “आपला तिसरा वाढदिवस साजरा करणाऱ्या कबीरला त्याच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन करायचे होते. म्हणून संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन साजरा केला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा कबीर.”
हार्दिक पंड्या आणि त्याचा मुलगा अगस्त्य यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये दोघांचेही नाते लोकांना आवडलेले दिसत आहे. अलीकडेच, त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविचपासून डिवोर्स घेऊन ते वेगळे झाल्याच्या बातमीनंतर, हार्दिक त्याच्या मुलासोबत वेळ घालवताना दिसला आहे. व्हिडिओमध्ये, यामध्ये अगस्त्य मनापासून भजन गात असल्याचे दिसते आणि हार्दिक त्याच्यासोबत आहे. या भावनिक दृश्याने चाहत्यांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२५ मध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला. यावेळीही मुंबईचा संघ अंतिम फेरीत धडक मारू शकला नाही. हार्दिक पंड्याने आतापर्यंत भारतासाठी ११ कसोटी, ९४ एकदिवसीय आणि ११४ टी-२० सामने खेळले आहेत. या काळात त्याने फलंदाजीत ४२४८ धावा फाटकावल्या आहेत. गोलंदाजीत त्याने २०२ विकेट्स मिळवल्या आहेत.