Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतचा धमाका! महिला क्रिकेटच्या इतिहासात कोरलं सुवर्ण अक्षरात नाव; केला ‘हा’ विक्रम

Harmanpreet Beats Suzie Bates Most International Matches Records: हरमनप्रीत कौर आता महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू बनली आहे. तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकत सर्वाधिक सामने खेळण्याचा मान मिळवला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 03, 2026 | 04:46 PM
photo - social media

photo - social media

Follow Us
Follow Us:
  • हरमनप्रीतचा धमाका
  • मोडला क्रिकेटचा सर्वात मोठा रेकॉर्ड
  • कौरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरी
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धचा तिसरा आणि अंतिम टी-२० आंतरराष्ट्रीय सामना गमावला असला तरी, कर्णधार हरमनप्रीतने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. हरमनने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात मैदानात उतरताच तिच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला.

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

हरमनप्रीतने ३६८ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा रेकॉर्ड मोडला

भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौरने मैदानावर पाऊल ठेवताच नवीन विश्वविक्रम रचला. ती आता एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅट मिळून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. हा हरमनप्रीतचा ३६८ वा सामना होता. यापूर्वी न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने ३६७ सामने खेळले आहेत. हरमनप्रीत कौरने आतापर्यंत ७ कसोटी, १६४ एकदिवसीय आणि १६४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हरमनप्रीत कौरने मिताली राजला आधीच मागे टाकले आहे. मिताली राजने आपल्या कारकिर्दीत एकूण ३३३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.  हरमनप्रीतने गेल्या अनेक वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी करत महिला क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

तिन्ही फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी

हरमनप्रीत कौरने २००९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने १० नोव्हेंबर २००९ रोजी इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले आणि आठ धावा केल्या. त्याच वर्षी नंतर, हरमनप्रीतने आपला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. २०१४ मध्ये कौरने कसोटी पदार्पण केले. हरमनप्रीतने भारतासाठी कसोटी, एकदिवसीय आणि T20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रभावी योगदान दिले आहे. विशेष म्हणजे महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही तिच्याच नावावर आहे. तिने भारतीय संघासाठी अनेक संस्मरणीय खेळी केल्या असून २०१७ महिला विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची १७१ धावांची खेळी आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.

कौरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरी

हरमनप्रीतने ७ कसोटी सामन्यात एका अर्धशतकासह २३० धावा केल्या आहेत. हरमनने १६४ एकदिवसीय सामन्यात ४,५४१ धावा केल्या आहेत. तिने या फॉरमॅटमध्ये ७ शतके आणि २४ अर्धशतके झळकावली आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हरमनप्रीतने १९७ सामन्यात ४,०७५ धावा केल्या आहेत.

महान खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान

हरमनप्रीतच्या मागोमाग सुझी बेट्स, ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी आणि भारताची मिताली राज या दिग्गज खेळाडूंचा क्रमांक लागतो. तिच्या या विक्रमामुळे भारतीय महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर आणखी मोठी ओळख मिळाली आहे. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०२६ च्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे.

IND W vs ENG W: टीम इंडियाची वाढली चिंता! इंग्लंडकडून मालिका पराभव, विश्वचषकाआधी संघ किती सज्ज?

Web Title: Harmanpreet kaur most international matches women cricket world record 368 matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • IND vs ENG T-20 Match
  • indian cricket team

संबंधित बातम्या

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता
1

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता

जरा बचके रहना! Team India सावधान; झिम्बाब्वेने तब्बल ‘इतक्या’ सामन्यात पाजले पाणी, 23 जुलैला…
2

जरा बचके रहना! Team India सावधान; झिम्बाब्वेने तब्बल ‘इतक्या’ सामन्यात पाजले पाणी, 23 जुलैला…

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
3

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘विराट आणि रोहितपेक्षा मला जास्त काळजी ही…’; Yuvraj Singh चे ‘ते’ विधान चर्चेत
4

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘विराट आणि रोहितपेक्षा मला जास्त काळजी ही…’; Yuvraj Singh चे ‘ते’ विधान चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.