IND W vs ENG W: टीम इंडियाची वाढली चिंता! इंग्लंडकडून मालिका पराभव, विश्वचषकाआधी संघ किती सज्ज?
ही घटना सामन्याच्या पहिल्या डावातील दहाव्या षटकादरम्यान घडली. विकेट पडल्यानंतर टिम डेविडने संतापाच्या भरात आइस बॅग जोरात फेकली. ही बॅग मैदानावरील अंपायर नितीन मेनन यांच्या दिशेने गेली. आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.९ अंतर्गत हा गुन्हा मानला जातो. नियमांनुसार खेळाडूंनी अशा प्रकारचे आक्रमक गैरवर्तन करणे गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे मॅच रेफरी जावगल श्रीनाथ यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत कारवाई केली.
टिम डेविडवर IPL कोड ऑफ कंडक्टच्या कलम २.९ अंतर्गत कारवाई करण्यात आली. या नियमांतर्गत सामन्यादरम्यान खेळाडू, संघ अधिकारी अंपायर सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या दिशेने चेंडू किंवा क्रिकेटचे साहित्य यांसारखी कोणतीही वस्तू अयोग्य किंवा धोकादायक पद्धतीने फेकणे गैरवर्तन समजले जाते. डेविडने आपली चूक मान्य केली असून त्याने मॅच रेफरींचा निर्णय स्वीकारला आहे. त्याला दोन डिमेरिट गुण देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, याआधीही टिम डेविडवर दोन वेळा शिस्तभंगाची कारवाई झाली होती. आयपीएल २०२६ च्या हंगामात टिम डेव्हिडचा हा तिसरा लेव्हल-१ गुन्हा आहे. आयपीएलच्या २० व्या सामन्यात पहिल्यांदाचा नियमांचे उल्लघंन केल्यावर त्याला एक डिमेरिट पॉईंट देण्यात आले होते. यानंतर, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ५४ व्या सामन्यात अश्लील हावभाव केल्याप्रकरणी त्याला मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला असून, २ डिमेरिट पॉइंट्सही देण्यात आले होते. आता अंतिम सामन्यातील घटनेनंतर त्याच्या खात्यात एकूण पाच डिमेरिट गुण जमा झाले आहेत.
आयपीएलच्या नियमांनुसार, पाच डिमेरिट पॉइंट्स जमा झाल्यास एका सामन्याची बंदी घातली जाते. त्यामुळे, टीम डेव्हिड ज्या फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करेल, त्या फ्रँचायझीकडून तो आयपीएल २०२७ हंगामाचा पहिला सामना खेळू शकणार नाही . जर तो आरसीबीसोबत राहिला, तर तो पुढील हंगामाच्या सलामीच्या सामन्यातून बाहेर होईल.
आरसीबीचा फिनिशर टिम डेव्हिडने आयपीएल २०२६ मध्ये १८८.२७ स्ट्राइक रेटने १६ सामन्यांत ३०५ धावा केल्या. यामध्ये एक अर्धशतकाचाही समावेश आहे. तसेच या हंगामात नाबाद ७० धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. या हंगामात डेव्हिडने २२ चौकार आणि २३ षटकार मारले. डेव्हिडने आतापर्यंत ६६ आयपीएल सामन्यांमध्ये १,१५१ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १७७.०८ आहे.






