हरदीप((फोटो-सोशल मीडिया)
World Wrestling Championship : हरियाणाच्या मुलाने जगात भारताची मन उंचावली आहे. रोहतकच्या बहादूरगड भागातील रहिवासी असणाऱ्या हरदीपने जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ग्रीसमध्ये १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कुस्तीगीर हरदीप हा मूळचा बामडोली गावचा रहिवासी आहे. तो मांडोथी येथील हिंद केसरी कुस्तीगीर सोनूच्या आखाड्यात सराव करत असतो. या विजयानंतर त्याचे प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीगीर धर्मेंद्र दलाल यांनी म्हटले आहे की, “हरदीपने भारतीय कुस्तीच्या इतिहासातही आपले नाव नोंदवले आहे. बहादूरगडला परतल्यावर हरदीपचे जोरदार स्वागत करण्यात येईल.”
प्रशिक्षक धर्मेंद्र कुस्तीगीर यांनी सांगितले की, “हरदीपने ११० किलो वजनी गटात ग्रीको रोमन गटाच्या अंतिम फेरीत इराणच्या कुस्तीगीरला पराभूत जागतिक चॅम्पियन चॅम्पियनचा किताब आपल्या नावावर केला आहे. या गटात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा हरदीप हा पहिलाच भारतीय कुस्तीगीर ठरला आहे. ” कुस्तीगीर हरदीपच्या या विजयामुळे मैदानासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशिक्षक धर्मेंद्र यांनी पुढे म्हटले की, हरदीप सोनू आखाड्यात सराव करता असे. त्यांनी संगितले की, “हरदीप हा खूप मेहनती आणि अशादायी खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूप्रमाणे त्याचे स्वप्न देखील ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची मान ताठ करणे आहे.”
हरदीपच्या प्रशिक्षकांनी हे देखील सांगितले की, “हरदीपने आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकून देशाला गर्व निर्माण करून दिला आहे.” तसेच ते पुढे म्हणाले की, “या कामगिरीनंतर मी हरदीपला आगामी स्पर्धांसाठी तयार करणार आहे. बामडोली गावात आनंदाची लाट असून त्याच्या आगमनानंतर त्याचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.”