इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स(फोटो-सोशल मीडिया)
इंडिया चॅम्पियन्सने मंगळवारी वेस्ट इंडिज चॅम्पियन्सना १३.२ षटकांत धुव्वा उडवून सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला होता. सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर भारताला पाकिस्तानशी दोन हात करावे लागणार होते. याआधी देखील, भारतीय संघाने लीग सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. ज्यामुळे भारत आणि पाकसितां यांच्यातील लीग स्टेज सामना रद्द करण्यात आला होता. कारण खेळाडू आणि स्पर्धेच्या मुख्य प्रायोजकांनी सामन्याबद्दल निषेध व्यक्त केला होता.
एका मीडिया रिपोर्टनुसार, इझीमायट्रीप नावाच्या कंपनीकडून सेमीफायनल सामन्यापूर्वी स्वतःला वेगळे करण्यात आले आहे. EaseMyTrip ही या स्पर्धेच्या मुख्य प्रायोजकांपैकी एक कंपनी आहे. त्यांनी सांगितले की, “आम्ही दहशतवाद पसरवणाऱ्या देशासोबत एक देखील सामना खेळणार नाही. आम्ही टीम इंडिया चॅम्पियन्सचे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. तुम्ही संपूर्ण देशाला गौरव मिळवून दिला आहे. पण पाकिस्तानविरुद्धचा आगामी सेमीफायनल सामना सोपा असणार नाही. क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र जाऊ शकत नाहीत. इझीमायट्रीप, आम्ही भारतासोबत असून दहशतवाद पसरवणाऱ्या देशाशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्या देखील कार्यक्रमाचे समर्थन करत नाही.”या से
ट्रॅव्हल-टेक कंपनीचे सह-संस्थापक निशांत पिट्टी यांनी बुधवारी एका निवेदनात म्हटले की, “भारतातील लोकांनी म्हटले आहे आणि आम्ही त्यांचे ऐकत आहोत. WCL मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याशी इझीमायट्रीप जोडले जाणार नाही. काही गोष्टी या खेळांपेक्षा देखील मोठ्या असतात. नेहमीच देश आधी, व्यवसाय नंतर.”
माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी देखील म्हटले आहे की, ते पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाहीत. धवनने यापूर्वीच पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दर्शवला होता.






