नरेंद्र मोदी(फोटो-सोशल मिडिया)
Olympics 2036 : केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंगळवारी ‘खेलो इंडिया’ धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. आता ज्यामुळे भारत जागतिक क्रीडा क्षेत्रात पहिल्या पाच देशांमध्ये स्थान मिळवणार आहे. खेळाडूंना प्रशिक्षण आणि पाठिंब्याच्या बाबतीत ‘जागतिक दर्जाची व्यवस्था’ निर्माण करण्यासोबत देशाला २०३६ च्या ऑलिंपिकसाठी एक मजबूत दावेदार बनवण्यासाठी प्रशासकीय रचना तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट असणार आहे. पूर्वी याला राष्ट्रीय क्रीडा धोरण असे म्हटले जात होते. ते पहिल्यांदा १९८४ मध्ये सादर केले गेले होते. खेलो इंडिया धोरण २०२५ हे आता २००१ च्या धोरणाची जागा घेणारया आहे. देशाच्या क्रीडा परिसंस्थेच्या सुधारणेसाठी योजना आखण्यासाठी हा एक ‘मार्गदर्शक दस्तऐवज’ असणार आहे.
हेही वाचा : आता केवळ ‘captain cool’ च नाही, तर ‘या’ खेळाडूंचाही ट्रेडमार्क नोंदणीकृत; पहा संपूर्ण यादी
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणाबद्दल आणि मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांबद्दल पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, “आम्ही गेल्या १० वर्षांच्या अनुभवाचा वापर केला असून नवीन धोरण क्रीडा सुधारण्यासाठी काम करणार आहे. त्याचे मुख्य उद्दिष्ट २०४७ पर्यंत भारताला पहिल्या पाच क्रीडा राष्ट्रांमध्ये स्थान देण्यात आले आहे. हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.” अशी माहिती वैष्णव यांनी दिली आहे.
भारताकडून २०३६ च्या ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. ज्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आणि देशात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला गेला आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या निवेदनामध्ये केंद्रीय मंत्रालये, नीती आयोग, राज्य सरकारे, राष्ट्रीय क्रीडा महासंघ, खेळाडू, या विषयावरील तज्ञ आणि भागधारकांशी ‘व्यापक सल्लामसलत’ केल्याचे नवीन धोरण असल्याचे वर्णन करण्यातआले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर लिहिलेया आहे की, “क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यात येण्यासाठी आणि क्रीडा केंद्र बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मंत्रिमंडळाने राष्ट्रीय क्रीडा धोरण, खेलो इंडिया धोरणाला मान्यता दिली आहे.खेलो इंडिया धोरण नवीन क्रांती आणेल.”
पंतप्रधान पुढे म्हणले की, “हे धोरण पाच स्तंभांवर आधारित असणार आहे. यामध्ये जागतिक स्तरावर उत्कृष्टता, आर्थिक विकासासाठी क्रीडा, सामाजिक विकासासाठी क्रीडा, जनचळवळ म्हणून क्रीडा, शिक्षणाशी एकात्मता (एनईपी २०२०) यांचा समावेश आहे.” तसेच ते म्हणाले, “भारतीय क्रीडा प्रतिभेची नेहमीच भरभराट व्हायला पाहिजे.”
हेही वाचा : IND Vs ENG : भारतीय संघात होणार मोठी उलथापालथ? एजबॅस्टन कसोटीत कुणाला लागणार लॉटरी, पहा संभाव्य playing XI
क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भारताच्या क्रीडा परिसंस्थेचे पुनर्निर्माण करण्याच्या दिशेने एक परिवर्तनकारी पाऊल आहे. त्यांनी ‘एक्स’ वर लिहिले की, “हे ऐतिहासिक धोरण तळागाळात क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, पायाभूत सुविधांना समर्थन देण्यासाठी, तसेच खेळाडू विकासाला समर्थन देण्यासाठी आणि जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताला एक मोठी शक्ती म्हणून स्थापित करण्यासाठी एक धोरणात्मक चौकट आहे.”