Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs PAK W: स्मृती-हरमनप्रीत जोडीचा ऐतिहासिक कीर्तिमान! पाकिस्ताविरुद्ध केली आजवरची सर्वात मोठी पार्टनरशिप

भारतीय संघासाठी स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६३ चेंडूंमध्ये ९१ धावांची भागीदारी केली. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी भारतीय संघाची ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 14, 2026 | 10:00 PM
स्मृती-हरमनप्रीत जोडीचा ऐतिहासिक कीर्तिमान! (Photo Credit- X)

स्मृती-हरमनप्रीत जोडीचा ऐतिहासिक कीर्तिमान! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • स्मृती-हरमनप्रीत जोडीचा ऐतिहासिक कीर्तिमान!
  • पाकिस्ताविरुद्ध केली आजवरची सर्वात मोठी पार्टनरशिप
  • वाचा संपूर्ण बातमी
IND W vs PAK W News: महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सहावा सामना बर्मिंगहॅममध्ये खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर १७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघासाठी स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६३ चेंडूंमध्ये ९१ धावांची भागीदारी केली. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी भारतीय संघाची ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. या कामगिरीसह हरमनप्रीत आणि मानधना यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मानधनाने अर्धशतक झळकावण्यात यश मिळवले, तर हरमनप्रीत कौर संथ खेळीनंतर बाद झाली.

मानधना आणि हरमनप्रीत यांच्यात ९१ धावांची भागीदारी

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या १८ धावांत दोन विकेट्स गमावल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर फलंदाजीसाठी आली आणि तिने स्मृती मानधनासोबत डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची शानदार भागीदारी करत भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. टी-२० मध्ये पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी भारताची ही आतापर्यंतची सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वीचा विक्रम शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या नावावर होता, ज्यांनी २०२४ मध्ये पहिल्या विकेटसाठी ८५ धावा जोडल्या होत्या.

स्मृती मानधनाची ६८ धावांची उत्कृष्ट खेळी

पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात स्मृती मानधनाने ६८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतीय महिला खेळाडूने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी सर्वाधिक धावांचा विक्रम मिताली राजच्या नावावर होता; तिने २०१६ मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध नाबाद ७३ धावा केल्या होत्या. मानधनाच्या ६८ धावांच्या जोरावर भारतीय संघाने एक मजबूत धावसंख्या उभारली.

IND W vs PAK W Live Score: स्मृती-ऋचाच्या बॅटिंगने पाकिस्तानात थरकाप! टीम इंडियाच्या १७० धावा; पाकड्यांना विजयासाठी कठीण आव्हान

मानधनानंतर रिचा घोषची वादळी फलंदाजी

या सामन्यात स्मृती मानधनाने शानदार फलंदाजी केली. तिने ४४ चेंडूंत ६८ धावा केल्या, ज्यामध्ये ९ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त, हरमनप्रीत कौरने ३६ धावांचे योगदान दिले आणि रिचा घोषने १७ चेंडूंत ३४ धावा केल्या. भारताच्या इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही आणि त्या कमी धावसंख्येवर बाद झाल्या. सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानला १७१ धावांची गरज आहे. पाकिस्तानकडून सादिया इक्बाल आणि फातिमा सना यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

दोन्ही संघाची प्लेइंग ११

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, श्री चरणी, क्रांती गौड

पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): गुल फिरोजा, मुनीबा अली (विकेटकीपर), आयशा जफर, सायरा जबीन, आलिया रियाझ, नतालिया परवेझ, फातिमा सना (कर्णधार), रमीन शमीम, नशरा संधू, तस्मिया रुबाब, सादिया इक्बाल

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! पाकिस्ताविरुद्ध मैदानात उतरताच रोहित शर्माचा ‘महाविक्रम’ काढला मोडीत

Web Title: Historic feat by the smriti harmanpreet duo achieved the highest ever partnership against pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • IND W vs PAK W
  • Smriti Mandhana
  • Sports News

संबंधित बातम्या

Sports News: पुण्यनगरीत टेबल टेनिसचा महासंग्राम! ज्येष्ठ खेळाडूंच्या जबरदस्त खेळाने जिंकली प्रेक्षकांची मनं
1

Sports News: पुण्यनगरीत टेबल टेनिसचा महासंग्राम! ज्येष्ठ खेळाडूंच्या जबरदस्त खेळाने जिंकली प्रेक्षकांची मनं

उंट, घोडा अन्…! बुद्धिबळाच्या पटावर आंतरराष्ट्रीय थरार; पुण्यात जगभरातून तब्बल 400…
2

उंट, घोडा अन्…! बुद्धिबळाच्या पटावर आंतरराष्ट्रीय थरार; पुण्यात जगभरातून तब्बल 400…

वादळी कामगिरी! Commonwealth मध्ये मेडल अन् ‘या’ खेळाडूंचा MP सरकार करणार सन्मान; 25 लाख अन् सरकारी…
3

वादळी कामगिरी! Commonwealth मध्ये मेडल अन् ‘या’ खेळाडूंचा MP सरकार करणार सन्मान; 25 लाख अन् सरकारी…

Commonwealth Games 2026: अस्मिता डे ने रचला इतिहास, Judo मध्ये कमावले पहिले Gold Medal; भारताची मान उंचावली
4

Commonwealth Games 2026: अस्मिता डे ने रचला इतिहास, Judo मध्ये कमावले पहिले Gold Medal; भारताची मान उंचावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.