फोटो सौजन्य : Ratnagiri Jets
कोण आहे दिव्यांग हिंगानेकर? : महाराष्ट्रमध्ये सुद्धा महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 सुरू आहे, यामध्ये अनेक मोठे क्रिकेट खेळाडू देखील सामील झाले आहेत. सूर्यकुमार यादव, शिवम दुबे त्याचबरोबर पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर हे खेळाडू देखील या लीगमध्ये सामील झाले आहेत. इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 18 वा सिझन संपल्यानंतर भारताचे महाराष्ट्रमधील काही खेळाडू हे एमपीएलमध्ये सामील झाले आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये मालिका सुरू होण्याआधी सध्या क्रिकेट विश्वामध्ये महाराष्ट्र प्रीमियर लीगची चर्चा सुरू आहे.
आता सध्या महाराष्ट्र प्रीमियर लीगचा एक खेळाडू मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे आणि तो आत्ताच स्टार झाला आहे. रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूर टक्कर्स यांच्यामध्ये सामना पार पडला. त्या सामन्यात एका खेळाडूने कहर केला आहे. रत्नागिरी जेट्स या संघाकडून खेळणारा दिव्यांग हिंगणेकर कर या खेळाडूने एकाच ओव्हर मध्ये पाच षटकार ठोकले आहेत.
रत्नागिरी जेट्स यांनी पहिले फलंदाजी करत 20 ओवर मध्ये 173 धावा केल्या होत्या. या सामन्यांमध्ये रत्नागिरी गेट्स यांनी त्यांचे पहिले चार विकेट्स लवकर गमावले होते. रत्नागिरीच्या संघाने तीन धावा असताना चार विकेट्स गमावले आणि संघाला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यानंतर मिडल ऑर्डरच्या खेळाडूंनी खेळ सांभाळला. या सामन्यांमध्ये दिव्यांग हिंगणेकर याने 26 जानेवारी 58 धावा केल्या त्याचबरोबर त्याने दोन विकेटही घेतले.
Ratnagiri Jets batter Divyang Hinganekar missed out on a unique record! 😬
He smashed five consecutive sixes but fell short of hitting six in an over during the Maharashtra Premier League 2025 🚀🥶#MPL #RJvKT #DivyangHinganekar #T20s #Sportskeeda pic.twitter.com/mirw8M41FR
— Sportskeeda (@Sportskeeda) June 7, 2025
दिव्यांगने कर्णधार अझीम काझीसह संघाच्या डावाची जबाबदारी घेतली आणि ९२ धावांची भागीदारी केली. दिव्यांगने वेगवान फलंदाजी करत फक्त २६ चेंडूत ५८ धावांची जलद खेळी केली. या सामन्यादरम्यान त्याने त्याच्या खेळीमध्ये ६ षटकार आणि २ चौकार मारले. अथर्व डाकवेच्या एकाच षटकात दिव्यांगने पाच षटकार मारले. या षटकातून दिव्यांगने एकूण ३२ धावा काढल्या. दिव्यांगच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे संघ २० षटकांत ७ गडी गमावून १७३ धावा करण्यात यशस्वी झाला. यावेळी मोठ्या खेळाडूमुळे महाराष्ट्र प्रिमीयर लीग अनेक लोकांपर्यत पोहोचली.