क्वालिफायर-1 : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा क्वालिफायर-1 सामन्याचे आज आयोजन करण्यात आले आहे. आजचा हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये रंगणार आहे. या सामन्यांमध्ये ज्या संघाचा विजय होईल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. तर ज्या संघाचा पराभव होईल त्या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. या संघाचा सामना एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघाशी होईल. आजचा हाय-व्होल्टेज सामना चाहते कधी, कुठे आणि कसा पाहू शकता यासंदर्भात सविस्तर वाचा.
[read_also content=”क्वालिफायर 1 मध्ये कोण मारणार बाजी? कोलकाता आणि हैदराबाद आमनेसामने https://www.navarashtra.com/sports/who-will-beat-baji-in-qualifier-1-kolkata-knight-riders-vs-sunrisers-hyderabad-536041.html”]
जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता आजचा सामना
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2024 चा क्वालिफायर-1 सामना मंगळवार, 21 मे रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र स्टेडियमवर रंगणार आहे. हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील आयपीएल 2024 क्वालिफायर सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. टॉस अर्धा तास आधी होईल. तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनलवर टीव्हीवर सनरायझर्स हैदराबाद आणि केकेआरचा थेट सामना पाहू शकता. त्याचबरोबर तुम्ही Jio Cinema ॲपवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स मॅचचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
कोलकाता विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या एकमेकांच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यत 26 सामने खेळले आहेत. यामध्ये कोलकाता नाईट राइडर्सने 17 सामने खेळले आहेत तर सनरायझर्स हैदराबादने 9 सामने जिंकले आहेत. आकडेवारी पाहता कोलकाता नाईट राइडर्सचे पारडे जड दिसत आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. या सीझनचा विचार केला तर कोलकाता नाईट राइडर्सचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ सुद्धा चांगल्या लयीत दिसत आहे. चालू हंगामात, दोन्ही संघ एकदा एकमेकांशी भिडले आहेत ज्यात केकेआरने विजय मिळवला आहे.