Champion Trophy 2025 : ICC कडून 'प्लेअर ऑफ द मंथ'साठी नामांकने जाहीर; 'या' धमाकेदार भारतीय खेळाडूचा समावेश..(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Champion Trophy 2025 : आयसीसीकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंना ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहेत. मागील महिन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या शुभमन गिल, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन फिलिप्स यांचा आयसीसीने नामांकन दिलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. ॲनाबेल सदरलँड आणि एलाना किंग यांचा देण्यात आली आहे.
शुभमन गिल, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन फिलिप्स या खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला फॉर्म कायम राखला आहे. त्यामुळे त्यांना प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन देण्यात आले आहे. शुभमन गिलने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले. त्याआधी त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताने इंग्लंडवर मालिका विजय मिळवला. या मालिकेत विजय मिळवून देण्यात शुभमन गिलने मोठा वाट उचलला होता. तसेच बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या विजयापूर्वी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यात 87 आणि 60 धावांचे मोठे योगदान दिले. याआधी त्याने अहमदाबादमध्ये ११२ धावांची शतकी खेळी खेळून मालिका विजयात योगदान दिले होते.
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी शानदार तयारी केली. फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेत मोठे योगदान दिले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला होता. 28 आणि 20 च्या नाबाद स्कोअरनंतर, त्याने लाहोरमधील तिरंगी मालिकेत 74 चेंडूत 106 धावांची धमकेदार खेळी साकारली होती. ज्यामध्ये त्याने सात षटकारांची आतिषबाजी केली होती. यानंतर ग्लेन फिलिप्सने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार सुरुवात केली. त्याने 39 चेंडूत 61 धावांची धमाकेदार खेळी खेळली, इतकेच नाही तर त्याने पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानचा अप्रतिम झेल घेतला होता. न्यूझीलंड संघाने पाकिस्तानविरुद्धचा सामना 60 धावांनी सहज जिंकला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्टीव्ह स्मिथची कामगिरी थोडी निराशाजनक राहिली होती. त्याने याआधी विश्व कसोटी चॅम्पियनशिप मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-0 ने श्रीलंकेवर गॅले येथे विजय मिळवून स्टँड-इन कर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहिल्या कसोटीत त्याने उस्मान ख्वाजासोबत 141 धावांची शानदार खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने १३१ धावांची दमदार खेळी केली होती. या चमकदार कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले आहे.
Champion Trophy 2025: ICC announces nominations for ‘Player of the Month’; ‘These’ explosive Indian players included..
Champion Trophy 2025 : ICC कडून ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नामांकने जाहीर; ‘या’ धमाकेदार भारतीय खेळाडूंचा समावेश..