IPL 2025 Tickets : आयपीएलची तिकिटे खरेदी कशी कराल? किती रुपयांमध्ये पाहू शकाल सामना?; (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. गेल्या हंगामात कोलकाता संघ विजेता ठरला होता. त्यामुळे विजेत्या संघाच्या घरेलू मैदानातूनच या हंगामाला सुरुवात होणार आहे.
आयपीएल विजेतेपदासाठी 10 संघ आमनेसामने उभे ठाकणार आहेत. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना 25 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. यावेळी आयपीएलचे सामने १३ मैदानांवर खेळवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
जे आयपीएलचे चाहते आहेत, त्यांना आयपीएलची तिकिटे कशी खरेदी करायची याची माहिती आम्ही देत आहोत. आयपीएलचे तिकीट कुठे मिळेल आणि तिकिटाची किंमत नक्की किती असणार? याबाबत या बातमीत तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.
आयपीएल 2025 मधील तिकिटांची किंमत 400 रुपयांपासून ते 35,000 रुपयांपर्यंत असणार आहे.
आयपीएल 2025 मधील सामन्याची तिकिटे ऑनलाइन खरेदी करू शकता. आयपीएल पाहण्यात उत्सुक असणारे प्रेक्षक बुक माय शो और डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटोला भेट देऊन तिकीट बुक करू शकतात. ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. या विशिष्ट सामन्याच्या तिकिटाची किंमत 900 ते 35,000 रुपयांपर्यंत असणार आहे.
आयपीएल सामन्याची तिकिटे ऑनलाइन सोबतच ऑफलाइन देखील उपलब्ध असणार आहे. या सामन्याचे आयोजन करणाऱ्या विविध स्टेडियमवर तिकिटे उपलब्ध असणार आहेत. विशेष काउंटरवर तिकीट खरेदी करता येईल.
हेही वाचा :Virender Sehwag : वीरेंद्र सेहवागसमोर उभे ठाकले मोठे संकट; धाकट्या भावाला पोलिसांकडून अटक; नेमकं प्रकरण काय?
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला असेल तरच तिकिटाचे रिफंड दिला जाईल. इतर कोणतेताही रिफंड मान्य करण्यात येणार नाही.
दुपारचे सामने सहसा शनिवार आणि रविवारी होतात. दुपारचा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. तर सायंकाळचे सामने साडेसात वाजता सुरू होणार आहेत.
आयपीएल 2025 मध्ये 22 मार्च ते 25 मे दरम्यान एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत.
मागील हंगामाप्रमाणे, माजी चॅम्पियन आणि आयपीएल 2025 चे उपविजेते सनरायझर्स हैदराबाद दोन तिकिटांच्या खरेदीवर एक विनामूल्य फॅन जर्सी भेट देणार आहे.